29.5 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरस्पोर्ट्सएम्बाप्पेचा विक्रम; विश्वचषकात २० सामने खेळणारा सर्वात युवा खेळाडू

एम्बाप्पेचा विक्रम; विश्वचषकात २० सामने खेळणारा सर्वात युवा खेळाडू

Google News Follow

फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे याने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आणखी एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली. मोरोक्कोविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात तो फिफा विश्वचषकात २० सामने खेळणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. याचबरोबर विश्वचषकात सर्वात वेगाने २० गोल करणाऱ्या खेळाडूचा मानही त्याने पटकावला.

२७ वर्षीय एम्बाप्पेने बोस्टन स्टेडियमवरील सामन्यात फ्रान्सच्या २-० विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या सत्रात पेनल्टीची संधी दवडल्यानंतर त्याने ६०व्या मिनिटाला शानदार गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्याने उस्मान डेम्बेलेच्या गोलसाठी अचूक पास देत फ्रान्सचा विजय निश्चित केला. या विजयासह फ्रान्सने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या सामन्यानंतर एम्बाप्पेने फ्रान्सकडून सर्वाधिक विश्वचषक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ह्यूगो लॉरिस याची २० सामन्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. तसेच त्याने अँटोनी ग्रिझमन, ऑलिव्हिए गिरूड आणि राफेल वराने यांना मागे टाकले. विश्वचषकात सर्वाधिक ३० सामने खेळण्याचा विक्रम अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याच्या नावावर आहे.

या विश्वचषकातील आठव्या गोलासह एम्बाप्पेच्या विश्वचषकातील एकूण गोलांची संख्या २० झाली आहे. २०१८, २०२२ आणि २०२६ या सलग तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये त्याने हा टप्पा गाठला. विश्वचषकातील सर्वाधिक गोलांच्या यादीत तो आता लिओनेल मेस्सीच्या (२१ गोल) अवघ्या एका गोलाने मागे आहे.

विश्वचषकातील विजयांच्या बाबतीतही एम्बाप्पेने नवा टप्पा गाठला आहे. स्वीडन, पॅराग्वे आणि मोरोक्कोविरुद्धच्या विजयांनंतर त्याच्या नावावर आता १७ विश्वचषक विजय जमा झाले आहेत. या यादीतही त्याच्यापुढे केवळ लिओनेल मेस्सी (२० विजय) आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा