29.5 C
Mumbai
Friday, July 17, 2026
घरक्राईमनामालग्नाचे आमिष दाखवून नराधमाने केले १३ वर्षीय मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून नराधमाने केले १३ वर्षीय मुलीवर अत्याचार

पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

कांदिवली परिसरात लग्नाचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी समता नगर पोलिसांनी ३२ वर्षीय नराधमाला अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कांदिवली पूर्व भागात आपल्या कुटुंबासोबत राहते. त्याच परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय आरोपीशी तिची ओळख होती. ८ जुलै रोजी आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी बोलावले. घरात कोणीही नसताना त्याने संधी साधून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला असता, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
हे ही वाचा:
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली

मुंबई मेट्रो-१ला मोठा आर्थिक दिलासा

ग्राहकांच्या तक्रारीनंतर स्विगी इन्स्टामार्टला नऊ नोटिस

“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की

इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. “या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकी दिल्याने मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने काही काळ हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
मात्र, दुसऱ्या दिवशी मुलीच्या वागण्यातील बदल पाहून तिच्या आईने विचारपूस केली. आईचा आग्रह आणि विश्वासाखातर मुलीने घडलेला प्रकार उघड केला. आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाने हादरलेल्या पालकांनी तात्काळ समता नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास समता नगर पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा