28.7 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरविशेषकाँग्रेसच्या 'नानां'चा भलताच थाट!

काँग्रेसच्या ‘नानां’चा भलताच थाट!

Google News Follow

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या पायांवर दूध व पाणी घालून पूजन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी पटोले यांच्यावर जोरदार टीका केली असून, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी या प्रकाराला “अत्यंत लाजिरवाणा आणि अयोग्य” असे संबोधले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पटोले सोफ्यावर बसलेले दिसतात, तर दोन व्यक्ती त्यांच्या पायांवर दूध व पाणी घालून पूजन करताना आणि पुष्पवृष्टी करताना दिसतात. धार्मिक विधीप्रमाणे त्यांच्या पायाजवळ फळेही ठेवण्यात आल्याचे व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी, “गुरुपौर्णिमा हा गुरुंचा सन्मान करण्याचा दिवस असला, तरी लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे स्वतःचे पाय धुवून घेणे योग्य नाही. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी नम्रतेचा आदर्श ठेवला पाहिजे,” असे मत व्यक्त केले. भाजपनेही या घटनेवर टीका करत हा प्रकार काँग्रेसच्या संस्कृतीचे प्रतीक असल्याचा आरोप केला.

दरम्यान, नाना पटोले यांनी या वादावर स्पष्टीकरण देताना, पाय धुणाऱ्या व्यक्ती या आपल्या कुटुंबातील तरुण सदस्य असल्याचे सांगितले. हा कौटुंबिक आणि पारंपरिक सन्मानाचा भाग होता, असा त्यांचा दावा आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या कृतीबाबत मतमतांतरे व्यक्त होत आहेत. काहींनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, तर काहींनी याला वैयक्तिक श्रद्धा आणि कौटुंबिक परंपरेचा भाग असल्याचे म्हटले. या घटनेमुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुरू झालेला कार्यक्रम राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा