28.7 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरबिजनेसजिओच्या दमदार लिस्टिंगनंतर रिलायन्सचीही घोडदौड

जिओच्या दमदार लिस्टिंगनंतर रिलायन्सचीही घोडदौड

नफ्यात ३३.८ टक्क्यांची विक्रमी वाढ

Google News Follow

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी केली आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करत कंपनीने नफ्यात मोठी वाढ नोंदवली. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत रिलायन्सचा एकत्रित निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत ३३.८ टक्क्यांनी वाढून २९,५५० कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला २२,०९२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा एकत्रित महसूलही २७.८ टक्क्यांनी वाढून ३.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनीच्या या दमदार कामगिरीत ऑइल टू केमिकल्स अर्थात तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायाचा मोठा वाटा आहे. या विभागाच्या EBITDA मध्ये ६७.९ टक्क्यांची वाढ होऊन तो २५,२०३ कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीचा एकूण EBITDA २३.९ टक्क्यांनी वाढून ६२,४०९ कोटी रुपये झाला. पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक तेलपुरवठ्यातील अडथळे लक्षात घेता रिलायन्सने कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी पर्यायी बाजारपेठांचा आधार घेतला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रतिकूल परिस्थितीतही कंपनीला आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यात यश आले.
हे ही वाचा:
सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वज फडकला

परकीय चलन साठ्यात आठवडाभरात १.२६९ अब्ज डॉलरची घट

बँक ऑफ बडोदाची दुसऱ्या तिमाहीत नफा ३५.८ टक्क्यांनी वाढला

सहा महिन्यांतच वित्तीय तूट ७.१४ लाख कोटींवर
दरम्यान, रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायानेही चांगली कामगिरी केली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचा EBITDA १७.७ टक्क्यांनी वाढून २२,२२३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जिओच्या शेअर बाजारातील दमदार पदार्पणानंतर या व्यवसायाकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागले आहे. मात्र, रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाला काही प्रमाणात आव्हानांचा सामना करावा लागला. या विभागाच्या मुख्य कमाईत १०.२ टक्क्यांची घट झाली. वाढता खर्च आणि बाजारातील बदलती मागणी याचा परिणाम रिटेल व्यवसायावर दिसून आला. असे असले तरी कंपनीने तिमाहीत ३०३ नवीन स्टोअर्स सुरू केले असून एकूण स्टोअर्सची संख्या जवळपास २० हजारांवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, रिलायन्सने व्यवसायवाढीसोबत आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यावरही भर दिला आहे. सप्टेंबर २०२६ अखेर कंपनीचे निव्वळ कर्ज १.१७ लाख कोटी रुपये होते. तेल शुद्धीकरण, डिजिटल सेवा आणि किरकोळ व्यापार या तिन्ही क्षेत्रांतील कामगिरीमुळे कंपनीच्या उत्पन्नाला बळ मिळाले आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि तेलपुरवठ्यातील अडथळे असतानाही रिलायन्सने नफ्यात केलेली वाढ महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या विस्ताराच्या रणनीतीकडे आणि जिओसह अन्य व्यवसायांच्या कामगिरीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा