28.7 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरराजकारणतुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा निवडणूक लढणार

तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा निवडणूक लढणार

पंजाबमध्ये ‘आप’ची पहिली उमेदवार यादी जाहीर

Google News Follow

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) शनिवारी (३१ ऑक्टोबर) पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत ४० उमेदवारांचा समावेश असून, मुख्यमंत्री भगवंत मान यांना पुन्हा एकदा धुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांनाही पक्षाने लुधियाना पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीत विद्यमान ३७ आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांनी धुरी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दलवीर सिंह गोल्डी यांचा सुमारे ५८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदाही पक्षाने त्याच मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली आहे. पंजाब विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंह संधवान यांना कोटकपूरा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.

संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिममधून उमेदवारी देण्याचा निर्णय विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मे २०२६ मध्ये कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना अटक केली होती. सध्या ते गुरुग्राममधील भोंडसी तुरुंगात आहेत. कथित बनावट जीएसटी व्यवहारांशी संबंधित या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती.

हे ही वाचा:

सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वज फडकला

लंडनमध्ये असल्याचे भासवून तरुणीचे पुण्यात वास्तव्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

मतचोरीच्या आरोपांवर संसदेत चर्चा करण्यास तयार

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू टँकरवर माइन हल्ला

पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. या बैठकीला भगवंत मान, मनीष सिसोदिया आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. पंजाबमध्ये २०२७ च्या फेब्रुवारी-मार्चदरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा