27.8 C
Mumbai
Saturday, August 15, 2026
घरक्राईमनामानांदेडमध्ये अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला

नांदेडमध्ये अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला

हाताला दुखापत, रुग्णालयात दाखल

Google News Follow

Related

शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१३ ऑगस्ट) घडली. गुरुद्वाराजवळ एका व्यक्तीने धारदार शस्त्राने (कृपाण) त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुखबीरसिंह बादल हे नांदेडमधील माता साहिब गुरुद्वाराजवळ असताना हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. हल्ल्यादरम्यान सुरक्षा पथकातील एक कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बादल हे पंजाबहून नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ते वैयक्तिक दौऱ्यावर आले होते आणि ठरलेल्या सुरक्षा व्यवस्थेनुसार त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. हल्ल्यानंतर बादल यांच्या हाताला दुखापत झाल्याचे समोर आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबतची प्राथमिक माहिती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

घटनेनंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात असून घटनास्थळावरील परिस्थितीचीही पाहणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

बांगलादेश अंधारात! १० तास लोडशेडिंग, ८ वाजताच दुकानं बंद

पंजाबमध्ये ‘हायटेक कॉपी’ प्रकरणानंतर ४५४ फार्मसी ऑफिसरच्या भरतीला ब्रेक

ऐतिहासिक क्षण! लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात प्रथमच ‘वंदे मातरम्’ने

घरासाठी व्हेज-नॉनव्हेजची अट? ताडदेवमधील रिअल इस्टेट एजंटचा व्हिडीओ व्हायरल

सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ला

सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. डिसेंबर २०२४ मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर सेवा बजावत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपस्थितांनी हल्लेखोराला पकडले होते. सध्याच्या नांदेड हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. हल्ल्यामागील कारण आणि आरोपीचा नेमका हेतू तपासातून स्पष्ट होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा