28 C
Mumbai
Sunday, August 16, 2026
घरदेश दुनियाएकाच फ्लाइट नंबरची दोन विमानं आमनेसामने; अमेरिकेत नेमके काय झाले?

एकाच फ्लाइट नंबरची दोन विमानं आमनेसामने; अमेरिकेत नेमके काय झाले?

फिनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील घटना

Google News Follow

Related

अमेरिकेतील फिनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एकाच फ्लाइट नंबरवर उड्डाण करणारी दोन प्रवासी विमानं एकमेकांच्या मार्गावर आल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. अमेरिकन एअरलाइन्सच्या दोन्ही विमानांना ‘Flight 2482’ हा एकच फ्लाइट नंबर देण्यात आला होता. मात्र, सतर्क हवाई वाहतूक नियंत्रकाने वेळीच परिस्थिती ओळखून दोन्ही विमाने सुरक्षित अंतरावर ठेवले.

संबंधित घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर फिनिक्स परिसरात घडली. यातील एक विमान शिकागोहून फिनिक्सला येत होते, तर दुसरे विमान फिनिक्सहून शिकागोकडे रवाना झाले होते. खराब हवामानामुळे शिकागो-फिनिक्स विमानाला उशीर झाला होता. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी एअरलाइनने दुसरे विमान वापरले. मात्र, दोन्ही विमानं एकाच फ्लाइट नंबरसह हवेत आल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलसमोर मोठी अडचण निर्माण झाली.

दोन्ही विमानांचे मार्ग एकमेकांना छेदणार असल्याचे लक्षात येताच अनुभवी एअर ट्रॅफिक कंट्रोलरने तातडीने दोन्ही विमानांमध्ये फरक करण्यासाठी त्यांना ‘American 2482 on the arrival’ आणि ‘American 2482 on the departure’ अशा वेगळ्या ओळखीने संबोधण्यास सुरुवात केली. येणाऱ्या विमानाला अधिक उंचीवर ठेवण्यात आले, तर फिनिक्सहून उड्डाण केलेल्या विमानाला ठरावीक उंचीपेक्षा वर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे दोन्ही विमानांमध्ये आवश्यक उभे अंतर कायम राहिले. दोन्ही वैमानिकांना एकमेकांचे विमान काही मैल अंतरावर असतानाच दिसेल, याचीही खात्री करण्यात आली.

हे ही वाचा:

चीनच्या बाजारात भारतीय वस्तूंची मागणी वाढली

‘टीटीपी’मध्ये सामील होण्याचा प्लॅन? बंगळूरूमधून असफूल मलिकला अटक

मोदींचा ‘बांधणी फेटा’ चर्चेत; वस्त्रपरंपरेला अनोखी मानवंदना!

रात्री स्क्रोलिंगची सवय ठरतेय झोपेची शत्रू

विमानं सुरक्षितपणे एकमेकांना पार केल्यानंतर येणाऱ्या विमानाच्या वैमानिकाने कंट्रोलरच्या कामगिरीचे कौतुक करत “Nice work” असे म्हटले. त्यावर कंट्रोलरने ही परिस्थिती विनाशकारी ठरू शकली असती, मात्र ती सुरक्षितपणे हाताळली गेल्याचे सांगितले. २५ वर्षांपासून एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये काम करणाऱ्या या अधिकाऱ्याने अशा प्रकारे दोन विमानं एकाच कॉल साइनवर जवळ येण्याची घटना यापूर्वी कधी पाहिली नसल्याचे सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा