28.9 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरराजकारणउपद्रवी कॉक्रोच आंदोलनावर सरकारचा कारवाईचा बडगा

उपद्रवी कॉक्रोच आंदोलनावर सरकारचा कारवाईचा बडगा

दिल्ली पोलिसांनी समर्थकांच्या गठड्या वळल्या

Google News Follow

Related

नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे शनिवार, १० ऑक्टोबरला दिल्ली पोलिसांनी केलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाची हवा निघून गेली. शनिवारी सकाळी जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र सकाळीच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आणि पदाधिकारी अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्लीत विमान उतरल्यावर विमानातच ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे हे मुख्य पदाधिकारीच आंदोलनस्थळी पोहोचू न शकल्याने सगळ्या आंदोलनाचा फज्जा उडाला.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने कॉक्रोच जनता पार्टी ही अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप होत होता. शिवाय, कॉक्रोच पार्टीचा प्रवक्ता म्हणून सौरव दासने हे आंदोलन केवळ ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेऊन थांबणार नाही तर अनेक दिवस चालेल अशी घोषणा केली होती. त्या तयारीने सगळ्यांनी आंदोलनस्थळी यावे असे आवाहनही करण्यात आले होते. पण हे सगळे आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच विमानातच त्यांना ताब्यात घेतले गेल्यामुळे आंदोलनाला कुणाचे नेतृत्वच उरले नाही.

या आंदोलनाच्या समर्थनार्थ जर्मनीहून दिल्लीत आलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर ध्रूव राठी यालाही त्याच्या दिल्लीतील घरातून ताब्यात घेण्यात आले.

जंतर मंतर येथे २० जुलैला झालेल्या आंदोलनात अनेक पोलिसांना मारहाण झाली होती. तोडफोड, जाळपोळही त्या आंदोलनात झाली. संसदेवर मार्च करण्याचा प्रयत्न तेव्हा आंदोलकांनी केला होता. ते सगळे लक्षात घेता यावेळी दिल्ली पोलिसांनी पूर्ण काळजी घेतली. कडेकोट बंदोबस्त केला.

 

दिपके आणि कंपनीवर प्रवाशांची टीका

दिपके आणि त्याच्या सहकाऱ्यांना विमानातच महिला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी विमानातील सहप्रवाशांनी कॉक्रोच पदाधिकाऱ्यांवर टीका केली. त्यांना पकडण्यात आले त्याबद्दल त्यांनी हे स्वच्छता अभियान असल्याची टीका केली. यांना देशाबाहेर सोडा अशीही अपेक्षा लोक व्यक्त करत होते.

हे ही वाचा:

 जंतर मंतरवर कॉक्रोचचे ओम् फट् स्वाहा

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर दिल्लीतील वाहतूक पूर्वपदावर

श्रेयसऐवजी शिवम दुबेला पाठवण्याची चूक भारताला महागात!

सौर वादळाचा पृथ्वीला तडाखा! भारतावर काय परिणाम?

या आंदोलनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. जवळपास २० हजार पोलिस या आंदोलनासाठी तैनात होते. निमलष्करी दलाच्या तुकड्याही आंदोलनस्थळी होत्या. जंतर मंतरकडे येणाऱ्य़ा सगळ्या रस्त्यांवर पोलिसांची गस्त होती. त्यामुळे कॉक्रोच समर्थक दिसले की त्यांची गठडी वळण्याचे काम पोलिसांनी केले. रेल्वेतून येणाऱ्या अनेकांनाही पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते. एकेठिकाणी पोलिसांवर दगडफेकही झाली. त्यात काही पोलिस जखमीही झाले.

या आंदोलनाला डाव्या विद्यार्थी संघटनांनीही पाठिंबा दिला पण त्यांनाही पोलिसांनी अडवले आणि गाडीत कोंबले. काँग्रेसचे मात्र कुणीही प्रतिनिधी आंदोलनस्थळी नव्हते.

दिपके आणि कंपनी अज्ञातवासात

पोलिसांनी या आंदोलनासाठी सगळीकडे अडथळे उभे केले होते. शिवाय, मेट्रो रेल्वे स्थानके बंद करण्याबरोबरच काही एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या होत्या. तरीही जे आंदोलक जंतर मंतर येथे आले, त्यांना पोलिसांनी गाड्यांमध्ये कोंबले आणि त्यांना दिल्लीतील डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले. अभिजित दिपके आणि त्याचे सहकारी यांना मात्र नेमके कोणत्या ठिकाणी नेण्यात आले, हे स्पष्ट झाले नव्हते. त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. दिपकेने प्रमुख पदाधिकारी अटकेत असतील तर त्यांचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करेल असे म्हटले होते. त्यानेही पत्रकार परिषद घेत दिपके नेमका कुठे आहे, हे माहीत नसल्याचे सांगितले.

या आंदोलनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी यावे असे आवाहन कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते, पण ज्या पद्धतीने पोलिसांनी समर्थकांना गाड्यांमध्ये कोंबले ते पाहता फार कमी संख्येने समर्थक जंतर मंतर येथे पोहोचले होते. शिवाय, पोलिसांनी ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे अशी व्यवस्था करून यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेसण घालण्याचे ठरविले होते. त्यामुळेही आंदोलक त्या भागात फिरकले नाहीत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आंदोलन केले पण त्यांनाही लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा