30 C
Mumbai
Wednesday, August 26, 2026
घरदेश दुनियारशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक

रशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक

‘शॅडो फ्लीट’मधील टँकर असल्याचा दावा

Google News Follow

Related

रशियन तेल वाहून नेणाऱ्या कथित ‘शॅडो फ्लीट’मधील टँकरवर काम करणाऱ्या भारतीय मर्चंट नेव्ही कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. अजय पंत (वय ३८) यांच्यावर रशियन तेलावरील निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या पत्नी ऋतू पंत यांनी पतीला या प्रकरणात ‘बळीचा बकरा’ बनवल्याचा दावा केला आहे.

पंत यांना जूनमध्ये ब्रिटनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. ब्रिटिश रॉयल मरीन आणि नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी ‘स्मर्टोस’ या तेल टँकरवर इंग्लिश चॅनेलमध्ये कारवाई केली होती. हेलिकॉप्टरच्या मदतीने ब्रिटिश कमांडोंनी टँकरवर प्रवेश करत जहाज ताब्यात घेतले. ब्रिटनच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची ही पहिली कारवाई असल्याचे सांगण्यात आले. ब्रिटिश तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, स्मर्टोस हा रशियाच्या कथित ‘शॅडो फ्लीट’चा भाग आहे. या फ्लीटमधील जहाजांचा वापर रशियावर लादलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांना चुकवून तेलाची वाहतूक करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे.

स्मर्टोस हे जहाज ५ जून रोजी रशियातील उस्त-लुगा बंदरातून निघाले होते आणि त्याचे गंतव्यस्थान इजिप्तमधील पोर्ट सेड असल्याचे नोंदवण्यात आले होते. या जहाजावर सुमारे ९८ हजार टन तेल असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. जहाजाचे कॅप्टन म्हणून अजय पंत यांना जहाजावरील मालाची माहिती होती आणि त्यांनी निर्बंधित रशियन तेल तिसऱ्या देशात पोहोचवण्याच्या प्रक्रियेत भूमिका बजावली. याच आधारावर त्यांच्यावर निर्बंध उल्लंघनाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपांमध्ये दोष सिद्ध झाल्यास कमाल १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

अजय पंत यांच्या बचाव पक्षाने न्यायालयात ते जहाजाच्या मालकाचे कर्मचारी असून ‘फक्त आदेशाचे पालन करत होते’, असा युक्तिवाद केला आहे. पंत यांच्या पत्नीनेही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. “माझ्या पतीला बळीचा बकरा बनवण्यात आलं. ते चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते,” असे ऋतू पंत यांनी म्हटले आहे. पतीशी अटकेनंतर झालेल्या पहिल्या फोनवरील संभाषणाची आठवण सांगताना त्या भावुक झाल्या. अजय पंत मानसिकदृष्ट्या खचले असून, “मी तुरुंगात आहे, मला बाहेर काढा,” असे त्यांनी फोनवर सांगितल्याचे पत्नीने म्हटले आहे.

हे ही वाचा:

संभल हिंसाचारातील सूत्रधार शारिक सट्टाविरोधात रेड कॉर्नर नोटीस

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’आधी पुण्यात राडा

“होर्मुझ आता अमेरिकेचा प्रदेश” ट्रम्प यांचा पुनरुच्चार

कॅनडातील गुरुद्वारात चाकूहल्ला; २७ वर्षीय आरोपी अटकेत

ब्रिटनमधील न्यायालयाने अजय पंत यांचा जामीन अर्ज नाकारला आहे. ते फरार होऊ शकतात किंवा त्यांना रशियाकडून ब्रिटनमधून बाहेर पडण्यासाठी मदत मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त करत न्यायालयाने जामीन नाकारल्याचे वृत्त आहे. पंत यांच्या आरोपांवरील सुनावणी १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यांचे आरोप रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर १२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अजय पंत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृती आणि परिस्थितीची माहिती घेतली आहे. जहाजावरील इतर २४ कर्मचाऱ्यांपैकी केवळ पंत यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून, बहुतेक इतर कर्मचाऱ्यांना मायदेशी परत पाठवण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा