29.5 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरक्राईमनामाअल्पवयीन मुलीला थपडा मारणाऱ्या मोहम्मद गुर्फान शेखच्या आवळल्या मुसक्या

अल्पवयीन मुलीला थपडा मारणाऱ्या मोहम्मद गुर्फान शेखच्या आवळल्या मुसक्या

नालासोपाऱ्यात गरबा मंडपाजवळ मारहाण

Google News Follow

नालासोपारा पूर्वेतील संतोषभुवन परिसरात गरबा कार्यक्रमादरम्यान मोहम्मद गुर्फान शेख या मुस्लीम तरुणाने एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली होत. यानंतर पेल्हार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोमवारी, १९ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

माहितीनुसार, पीडित मुलगी संतोषभुवनमधील गारेल पाडा येथे आयोजित गरबा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यावेळी मोहम्मद गुर्फान शेख याने अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केले आणि त्यांना अयोग्य स्पर्श केला. यासंबंधी तरुणीने त्याला जाब विचारला असताना आरोपीने तिला गरबा मंडपाबाहेर ओढून नेले आणि मारहाण केली. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपीने मुलीला थप्पड मारल्याचे कैद झाले आहे.

हे ही वाचा:

हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या कटाची ‘हेट क्राइम’ म्हणून चौकशीची मागणी

३१ डिसेंबर २०२९ पर्यंत भारत नशामुक्त करण्याचे लक्ष्य!

पॅरिसहून परतताच भगवंत मान यांना विमानतळावर तीन तास थांबवले

भारत-अमेरिका कराराच्या वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरूच; शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा!

पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन कांबळे यांच्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी यांची पूर्वी मैत्री होती. मात्र, मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केल्याने तो नाराज होता. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. व्हिडिओमध्ये आजूबाजूला लोक उपस्थित असतानाही मुलीला मारहाण होत असल्याचे दिसते. या घटनेनंतर पेल्हार पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा