काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हापासून व्हिएतनाम दौऱ्यावर गेले, तेव्हापासून चर्चा सुरू आहे की, भारतात परतताना ते काहीतरी नवीन टूलकिट घेऊन येणार आहेत. व्हिएतनाममध्ये जाऊन हा माणूस चार दिवसांत परतला; म्हणजेच काही तपश्चर्येसाठी गेले होते, असे म्हणण्याची सोय नाही. ती एक धावती भेट होती, तीसुद्धा १ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर होणाऱ्या निषेध सभेच्या आधी. याचा अर्थ तिथे त्यांनी काहीतरी शिजवून आणले आहे, हे नक्की. फ्रान्ससह युरोपमध्ये जे काही घडत आहे, त्यामागे एक समान सूत्र आहे. ते सूत्र ज्याच्या हाती आहे, त्या सूत्रधाराशी संबंधित कोणाची राहुल गांधींनी भेट घेतली आहे का, हे १ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. जे काही असेल ते असेल, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, दिल्लीत गर्दी जमा करण्यामागील काँग्रेसचा इरादा चांगला नाही. राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी रवाना झाले आणि २२ ऑक्टोबरला परतले. याचा अर्थ ते ऐशारामासाठी गेले नव्हते, तर काहीतरी कामासाठी गेले असणार. कदाचित एखादी महत्त्वाची गाठभेट असणार आहे. काँग्रेसची सभा अगदी १०-१२ दिवसांवर असताना त्यांचा हा दौरा होणे हेच सांगते की, बैठक अत्यंत महत्त्वाची असणार. ते काय करायला गेले होते, हे मोदी सरकारला माहीत असेलच, त्यामुळे सरकार तयारीत असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.



