29 C
Mumbai
Saturday, August 29, 2026
घरबिजनेसयुपीआयची दशकपूर्ती; डिजिटल पेमेंट्समधील ऐतिहासिक ‘टर्निंग पॉइंट’!

युपीआयची दशकपूर्ती; डिजिटल पेमेंट्समधील ऐतिहासिक ‘टर्निंग पॉइंट’!

‘युपीआय’ला दहा वर्षे पूर्ण

Google News Follow

Related

भारताच्या डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘युपीआय’ला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दशकभराच्या प्रवासाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीआयला भारताच्या डिजिटल पेमेंट्सच्या प्रवासातील ‘टर्निंग पॉइंट’ असल्याचे म्हटले आहे. युपीआयने केवळ व्यवहार करण्याची पद्धत बदलली नाही, तर देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे.

२०१६ मध्ये सुरुवात झालेल्या युपीआयने गेल्या दहा वर्षांत मोठी झेप घेतली आहे. सुरुवातीच्या आर्थिक वर्षात युपीआयशी ४४ बँका जोडलेल्या होत्या. २०२५-२६ या आर्थिक वर्षापर्यंत ही संख्या वाढून ७०३ बँकांवर पोहोचली आहे. युपीआयच्या व्यवहारांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. २०२५ मध्ये युपीआयवरून सुमारे २२ हजार कोटी व्यवहार झाले. म्हणजेच दररोज सरासरी सुमारे ६० कोटी व्यवहार युपीआयच्या माध्यमातून झाले. ऑगस्ट २०२५मध्ये पहिल्यांदाच एका महिन्यात २ हजार कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली, तर डिसेंबर २०२५मध्ये हा आकडा २,१६३ कोटी व्यवहारांवर पोहोचला.

युपीआय आता केवळ भारतापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या डिजिटल पेमेंट्सच्या या मॉडेलमुळे जलद, सुरक्षित आणि सुलभ डिजिटल व्यवहार सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २०२५मध्ये युपीआयने जागतिक रिअल-टाइम पेमेंट्समध्ये भारताचा वाटा जवळपास निम्म्याच्या आसपास नेला होता.

युपीआयच्या वाढीचा मोठा फायदा छोट्या व्यापाऱ्यांनाही झाला आहे. रोख पैशांऐवजी QR कोडच्या माध्यमातून काही सेकंदांत पैसे स्वीकारणे शक्य झाल्याने डिजिटल व्यवहार ग्रामीण आणि निमशहरी भागातही पोहोचले आहेत. केंद्र सरकारने कमी मूल्याच्या BHIM-UPI व्यापारी व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी १,५०० कोटींची प्रोत्साहन योजनाही मंजूर केली होती.

हे ही वाचा:

पावसाची दुसरी इनिंग सुरू? उपग्रहातून दिसला ढगांचा प्रचंड पट्टा

साखरेच्या साठेबाजीला चाप; दोन महिन्यांत विक्रीची सक्ती

सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ला प्रकरण; पाच राज्यांत धाडी

क्रिकेट पंचावर बॅटने हल्ला करणारा ३६ वर्षांनी पकडला

युपीआयसोबतच आधार, डिजिलॉकर, भारतनेट आणि 5G यांसारख्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे भारतातील डिजिटल इकोसिस्टम अधिक मजबूत झाली आहे. एप्रिल २०२५मध्येच युपीआयवरून १,८६७.७ कोटी व्यवहार, तब्बल २४.७७ लाख कोटींच्या मूल्याचे, झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा