30 C
Mumbai
Tuesday, August 25, 2026
घरक्राईमनामाक्रिकेट पंचावर बॅटने हल्ला करणारा ३६ वर्षांनी पकडला

क्रिकेट पंचावर बॅटने हल्ला करणारा ३६ वर्षांनी पकडला

मिरा रोडमध्ये केले जेरबंद

Google News Follow

Related

क्रिकेट सामन्यात बाद दिल्याचा राग मनात धरून पंचावर क्रिकेटच्या बॅटने जीवघेणा हल्ला करून तब्बल ३६ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला बोरीवली पोलिसांनी मिरा रोड येथून अटक केली. ओमप्रकाश ललता पासी (५५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून ही कारवाई केली.

ही घटना १९९० मध्ये बोरीवली परिसरात घडली होती. त्यावेळी पासी हा १८ वर्षांचा होता. क्रिकेट सामना सुरू असताना पंचांनी त्याला बाद घोषित केले. या निर्णयाचा राग आल्याने पासीने हातातील क्रिकेटच्या बॅटने पंचावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पंच गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पासी घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/१९९० दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पासी वारंवार गैरहजर राहू लागला. अखेर न्यायालयाने त्याला फरार घोषित केले.

पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी तो सातत्याने राहण्याचे ठिकाण आणि संपर्काची माहिती बदलत होता.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी उपलब्ध माहिती, संपर्क आणि हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पासी सध्या मिरा रोड परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले.

माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने बोरीवली पोलिसांच्या पथकाने मिरा रोड पूर्वेकडील पूनम रेसिडेन्सी येथे छापा टाकला. तेथे पासी याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. सध्या तो एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

यशस्वी-असिथा मैदानात भिडले; दंड बसला!

‘खेलो इंडिया संवाद’चा मोदींशी महासंवाद

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल गेले बीजिंगला, सीमा वादावर तोडगा निघणार?

काश्मिरी पंडितांची नाव-पत्त्यासह नंबर असलेली यादी दहशतवाद्यांकडून जारी

ही कारवाई उत्तर विभाग-२ चे पोलिस उपायुक्त संदीप घुगे, सहायक पोलिस आयुक्त संतोष धनवटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुष्पलता मंडले आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिग्विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अतुल लांडगे, सहायक पोलिस शिपाई भालचंद्र थोरात, पोलिस हवालदार सुशांत तांबे तसेच कैलास उगळे आणि कदम यांनी आरोपीचा माग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा