31 C
Mumbai
Wednesday, August 26, 2026
घरस्पोर्ट्सईटीपीएलमध्ये राहुल द्रविडची नवी इनिंग

ईटीपीएलमध्ये राहुल द्रविडची नवी इनिंग

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड आता युरोपियन टी२० प्रीमियर लीगमध्ये (ईटीपीएल) नव्या भूमिकेत दिसणार आहेत. डब्लिन गार्डियन्स फ्रँचायझीचे सहमालक म्हणून द्रविड प्रथमच संघाच्या व्यवस्थापन आणि उभारणीच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होत आहेत.

द्रविड यांनी सांगितले की, खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणून क्रिकेटमध्ये काम करण्याची त्यांना सवय आहे. मात्र, संघाची उभारणी करणे, प्रशिक्षक व खेळाडूंची निवड, तसेच मार्केटिंग आणि फायनान्ससारख्या जबाबदाऱ्या सांभाळणे हे त्यांच्यासाठी वेगळे आव्हान आहे.

“मी नेहमीच खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणून क्रिकेटशी जोडलेलो आहे. मात्र, आता संघ उभारण्यापासून प्रशिक्षक, खेळाडू, मार्केटिंग आणि फायनान्ससारख्या गोष्टी हाताळण्याची संधी मिळत आहे. हे माझ्या कम्फर्ट झोनच्या थोडे बाहेर आहे, पण त्याचवेळी खूप रोमांचकही आहे,” असे द्रविड यांनी जिओस्टारला सांगितले.

युरोपमध्ये क्रिकेटच्या विस्ताराला मोठी संधी असल्याचे द्रविड यांनी म्हटले. अधिकाधिक मुला-मुलींना क्रिकेटशी जोडण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत हा खेळ पोहोचवण्यासाठी ईटीपीएलसारख्या लीग महत्त्वाच्या ठरू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

टी२०मुळे युरोपात क्रिकेटला नवी ओळख

कसोटी क्रिकेट हा आपला आवडता आणि क्रिकेटचा सर्वोच्च फॉरमॅट असल्याचे द्रविड यांनी सांगितले. मात्र, क्रिकेटचा विस्तार काही मोजक्या देशांपुरता मर्यादित न ठेवता जगभर करायचा असेल, तर टी२० फॉरमॅट सर्वाधिक प्रभावी ठरू शकतो, असे त्यांचे मत आहे.

युरोपातील नव्या प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्यासाठी टी२० हा योग्य पर्याय आहे. एकदा लोक या खेळाशी जोडले गेले की, भविष्यात या भागात वनडे आणि कसोटी क्रिकेटच्या विस्ताराचाही विचार करता येईल, असे द्रविड यांनी सांगितले.

२६ ऑगस्टपासून ईटीपीएलचा थरार

युरोपियन टी२० प्रीमियर लीगचा पहिला हंगाम २६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्येही या लीगबाबत उत्सुकता आहे. राहुल द्रविड डब्लिन गार्डियन्सचे सहमालक असून, बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे लीगचे सहसंस्थापक आहेत.

याशिवाय रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे आणि विजय शंकर हे भारतीय क्रिकेटपटूही ईटीपीएलमधील विविध संघांशी जोडले गेले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा