28 C
Mumbai
Monday, August 31, 2026
घरसंपादकीयकार्यक्रम आरएसएसचा; मग ममदानीला का वांत्या?

कार्यक्रम आरएसएसचा; मग ममदानीला का वांत्या?

Google News Follow

Related

​राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून न्यूयॉर्क शहरात त्यांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमेरिकेतील ‘अहेड’ (AHEAD) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, विविध हिंदू संस्था व संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने या कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले आहे. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘मॅडिसन स्क्वेअर’ येथे २९ ऑगस्ट रोजी हा सोहळा पार पडणार असून सुमारे ५,००० नागरिक या प्रबोधनपर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

​या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि विषय म्हणजे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या सनातन भारतीय विचाराचा प्रसार करणे हा आहे. जग हे एक कुटुंब आहे, सर्वांनी परस्पर सहकार्याने आणि एकत्रितपणे वाटचाल केली पाहिजे, मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो; आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रगती साधली पाहिजे, असाच सर्वसमावेशक संदेश या व्यासपीठावरून मोहनराव भागवत देणार आहेत.

​मोहनराव भागवत यांचे अमेरिकेत आगमन झाल्यानंतर तेथील विविध हिंदू संघटनांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. मात्र, न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांना या कार्यक्रमामुळे अचानक पोटदुखी उठल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील किंवा न्यूयॉर्कमधील पहिले मुस्लिम महापौर म्हणून एक आगळावेगळा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला असला, तरी त्यांनी या कार्यक्रमाला जाहीर विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

पदक मिळेपर्यंत घरी जाणार नाही!

ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्टसह मोठ्या विक्रेत्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा

सोन्याचा दर १ लाख ७० हजारांच्या उंबरठ्यावर

भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे!

​जरी हा मेळावा एका खाजगी जागेत होत असल्यामुळे तो पूर्णपणे थांबवणे किंवा त्यावर कायदेशीर बंदी आणणे शक्य नसले, तरी अशा प्रकारचा कार्यक्रम होण्यास आपला विरोध आहे, अशी भूमिका ममदानी यांनी मांडली आहे. संघाची विचारधारा ही भेदभावाला खतपाणी घालणारी आहे, असा दावा करत त्यांनी आपल्या विरोधाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे.

​अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय तसेच हिंदू धर्मीयांना लोकशाही अधिकारांनुसार आपापल्या पसंतीच्या वक्त्यांना आमंत्रित करण्याचा आणि त्यांचे विचार ऐकण्याचा पूर्ण हक्क आहे. ममदानी हे सातत्याने अमेरिकन संविधान, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारत असतात; परंतु जेव्हा एखाद्या हिंदू संघटनेच्या कार्यक्रमात आरएसएसच्या सरसंघचालकांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावले जाते, तेव्हा मात्र त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना धुळीस मिळतात.

​मोहनराव भागवत यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम सोसायटी’ (Indian American Muslim Society) आणि स्वतःला मानववाधिकारवादी म्हणवणारी ‘हिंदू हुमन राईट्स’ (Hindu Human Rights) नावाची संघटना एकत्र आल्याचे दिसतात. केवळ नावात ‘हिंदू’ वापरणारी ही संघटना प्रत्यक्षात हिंदू धर्माचे कोणतेही सण, परंपरा किंवा सण-उत्सव पाळत नाही, उलट सातत्याने हिंदुत्वाला आणि हिंदूंच्या उपक्रमांना विरोध करण्याचेच काम करते. २९ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शने करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

​ममदानी आणि त्यांच्या समर्थक संघटनांकडून सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘कट्टर’ किंवा ‘अतिरेकी’ विचारांचे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, ज्या वेळी खरोखरच हातामध्ये बंदुका घेऊन निष्पाप नागरिकांची हत्या करणारे उग्रवादी किंवा दहशतवादी असतात—उदा. अमेरिकेतील ९/११ चा ट्विन टॉवर्सवरील भीषण हल्ला—त्या वेळी अशा घटनांवर किंवा अशा हिंसक विचारसरणींवर बोलण्याची हिंमत या तथाकथित पुरोगामी आणि मानवाधिकार संघटना दाखवत नाहीत. ​ज्यांनी अमेरिकेवर थेट हल्ले केले, त्यांच्याविरोधात चकार शब्द न काढणारे हे लोक, जेव्हा निशस्त्रपणे व्यासपीठावरून ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश देणारे मोहनराव भागवत येतात, तेव्हा मात्र त्यांच्यावर ‘अतिरेकी’ असा शिक्का मारण्याचा प्रयत्न करतात.

​अमेरिकेत ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम सोसायटी’चे कार्यक्रम किंवा मेळावे होतात, तेव्हा स्थानिक हिंदू संघटनांनी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही कायदा हातात घेऊन विरोध केलेला नाही. प्रत्येकाला आपापल्या विचारांचा प्रसार कायद्याच्या चौकटीत राहून करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग मोहनराव भागवत यांच्या संदर्भातच हा दुटप्पीपणा का दाखवला जात आहे?

​जोहरान ममदानी हे केवळ एका ठराविक समुदायाचे नाहीत, तर ते संपूर्ण न्यूयॉर्कचे महापौर आहेत. त्यांना हिंदूंनीसुद्धा मते दिली आहेत. त्यामुळे शहराचे प्रथम नागरिक म्हणून अशा लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कार्यक्रमाचा सन्मान करणे किंवा तिथे उपस्थित राहून विचार ऐकून घेणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. परंतु कार्यक्रमाला विरोध करून ते एका प्रकारे तेथील हिंदू समाजाचा आणि त्यांच्या लोकशाही स्वातंत्र्याचा अनादर करत आहेत.

​ममदानी अनेकदा भाषणांमध्ये सांगतात की, “जरी मी मुस्लिम असलो तरी माझी मुळे हिंदुस्थानातील आहेत”, तसेच त्यांच्या आई प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आहेत. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येते, तेव्हा भारतीय मुळांचा आणि संस्कृतीचा विसर पडून त्यांची ही राजकीय पोटदुखी उघडी पडते.

​भारतामध्ये जसे ‘तथाकथित पुरोगामी’ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंका पिटत स्वतःच्या सोयीचे राजकारण करतात, तसाच प्रकार आज अमेरिकेतही पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करून, परवानगी घेऊन आणि शांततेच्या मार्गाने आयोजित केला जात आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांचा मुख्य त्रास कार्यक्रमाला नसून, वाढत चाललेल्या हिंदू विचारसरणीला आणि प्रभावाला आहे, हेच या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा