31 C
Mumbai
Tuesday, September 22, 2026
घरस्पोर्ट्समैसूर एक्सप्रेस’ जवागल श्रीनाथ!

मैसूर एक्सप्रेस’ जवागल श्रीनाथ!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाजांमध्ये जवागल श्रीनाथ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘मैसूर एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीनाथ यांनी आपल्या वेग, स्विंग आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

श्रीनाथ यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६९ रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे झाला. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारे श्रीनाथ हे कपिल देव यांच्यानंतर भारतीय क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीचे प्रमुख चेहरे ठरले. कपिल देव यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली.

वेग, स्विंग आणि स्लोअर बॉलचा प्रभावी वापर हे श्रीनाथ यांच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य होते. १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या श्रीनाथ यांना १९९७ मध्ये दुखापत झाली. त्यामुळे त्यांना जवळपास संपूर्ण वर्ष क्रिकेटपासून दूर राहावे लागले. त्यांची कारकीर्द संपुष्टात येईल, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच त्यांनी दमदार पुनरागमन केले.

१९९८ हे वर्ष श्रीनाथ यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले. दुखापतीनंतर त्यांच्या वेगावर परिणाम झाला असला, तरी विकेट घेण्याची क्षमता आणखी प्रभावी झाली.

वेगाचा विक्रमही नावावर

१९९९ च्या वनडे विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध श्रीनाथ यांनी ताशी १५४.५ किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. २०२३ पर्यंत वनडे क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू होता. २०२३ मध्ये उमरान मलिकने श्रीलंकेविरुद्ध ताशी १५६ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत हा विक्रम मोडला.

श्रीनाथ यांनी २००२ मध्ये श्रीलंकेसोबत संयुक्तपणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच २००३ च्या वनडे विश्वचषकात भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

विशेष म्हणजे, २००३ च्या विश्वचषकापूर्वी श्रीनाथ यांनी निवृत्ती जाहीर केली होती. मात्र तत्कालीन भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी त्यांना पुन्हा संघात आणले. पुनरागमनानंतर श्रीनाथ यांनी विश्वचषकात ११ सामन्यांत १६ विकेट्स घेत दमदार कामगिरी केली.

श्रीनाथ यांनी भारतासाठी १९९२, १९९६, १९९९ आणि २००३ असे चार वनडे विश्वचषक खेळले. २००३ च्या विश्वचषकानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

वनडेत ३१५ विकेट्स

जवागल श्रीनाथ हे वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे वेगवान गोलंदाज आहेत. अनिल कुंबळे यांच्यानंतर ते भारताचे दुसरे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहेत.

आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत २२९ वनडे सामन्यांत ३१५ विकेट्स घेणारे श्रीनाथ हे ३०० वनडे विकेट्स घेणारे एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. कसोटीतही त्यांनी ६७ सामन्यांत २३६ विकेट्स घेतल्या.

निवृत्तीनंतर श्रीनाथ यांनी समालोचन किंवा प्रशिक्षकपदाऐवजी आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम करण्याचा मार्ग निवडला. सध्या ते आयसीसीच्या प्रतिष्ठित मॅच रेफरींपैकी एक आहेत.

१९९९ मध्ये जवागल श्रीनाथ यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा