30 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरबिजनेसपुण्यात रिक्षा प्रवास महागला; किमान भाडे ३० रुपये

पुण्यात रिक्षा प्रवास महागला; किमान भाडे ३० रुपये

रोजच्या प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पुणेकरांच्या खिशाला आता रिक्षा प्रवासाचा आणखी भार सहन करावा लागणार आहे. १ सप्टेंबरपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचे सुधारित भाडेदर लागू झाले आहेत. नव्या दरानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली. वाढता इंधन खर्च, वाहनांची देखभाल, विमा आणि इतर खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या भाडेवाढीचा सर्वाधिक परिणाम दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे. विशेष म्हणजे, २०२१ पासून पुण्यात रिक्षाच्या भाड्यात झालेली ही चौथी वाढ आहे. पाच वर्षांपूर्वी १८ रुपये असलेले किमान भाडे आता ३० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासाच्या खर्चात लक्षणीय वाढ होणार असून, आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या मासिक बजेटवर त्याचा अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
पुण्यात रिक्षा प्रवास महागला; किमान भाडे ३० रुपये

उत्तराखंडमध्ये मान्यता नसलेले मदरसे होणार बंद!

मुंबईत सीएनजी २ रुपये, तर पीएनजी १ रुपयाने महागले

व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला! १९ किलोच्या दरात ₹९.५० वाढ

दरम्यान, सुधारित भाडे आकारताना प्रवाशांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व रिक्षांचे मीटर नव्या दरांनुसार कॅलिब्रेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी रिक्षाचालकांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत प्रत्येक रिक्षामध्ये अधिकृत भाडे तक्ता लावणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना योग्य भाडे समजण्यास मदत होईल आणि चालक-प्रवाशांमधील वादही कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, रिक्षाचालकांसाठी खर्चाच्या वाढत्या ओझ्यापासून दिलासा देणारी ही भाडेवाढ, प्रवाशांसाठी मात्र ‘प्रवास महागला’ अशीच परिस्थिती निर्माण करणारी ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा