28 C
Mumbai
Thursday, September 17, 2026
घरबिजनेसमुंबईत सीएनजी २ रुपये, तर पीएनजी १ रुपयाने महागले

मुंबईत सीएनजी २ रुपये, तर पीएनजी १ रुपयाने महागले

मुंबईकरांना महागाईचा पुन्हा झटका

Google News Follow

Related

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांच्या दैनंदिन खर्चात पुन्हा वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) १ सप्टेंबरपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची, तर घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस अर्थात पीएनजीच्या दरात प्रति एससीएम १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर ८८ रुपये प्रतिकिलो, तर पीएनजीचा दर ५३ रुपये प्रति एससीएम झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीचा परिणाम गॅसच्या किमतीवर झाला आहे. सीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीत एलएनजीचा वापर करावा लागत असून त्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या इनपुट खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय एमजीएलने घेतला आहे.
हे ही वाचा:
“दहशतवाद कोणासाठीही रणनीतिक साधन ठरू शकत नाही”

व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला! १९ किलोच्या दरात ₹९.५० वाढ

सुभाष चंद्रांना मोठा झटका; एनसीएलटीकडून दिवाळखोरी आदेशाला स्थगिती

जागतिक संकटातही भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी; जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के

सीएनजीच्या दरवाढीचा थेट परिणाम रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनधारक तसेच व्यावसायिक वाहनचालकांवर होणार आहे. इंधनाचा खर्च वाढल्याने प्रवासाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पीएनजी महागल्याने घरगुती गॅस वापरणाऱ्या लाखो कुटुंबांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. आधीच महागाईमुळे वाढलेल्या दैनंदिन खर्चात आता गॅसच्या दरवाढीची भर पडल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा