31 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरबिजनेसओरॅकलमध्ये १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट

ओरॅकलमध्ये १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट

भारतातील हजारो कर्मचाऱ्यांनाही बसणार फटका?

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

क्लाऊड आणि एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणाऱ्या ओरॅकलकडून पुन्हा मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली जाण्याची शक्यता आहे. कंपनी जगभरातील सुमारे ७ हजार ते १० हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या संभाव्य कपातीचा फटका भारतातील हजारो कर्मचाऱ्यांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भारतात नेमक्या किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीकडून विविध विभागांचे बजेट कमी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

या संभाव्य नोकरकपातीमुळे भारतातील ओरॅकल कर्मचाऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. अभियांत्रिकी, क्लाऊड, तंत्रज्ञान आणि सपोर्ट यांसारख्या विविध विभागांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला किंवा १५ सप्टेंबरच्या आसपास कंपनीकडून याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात ओरॅकलच्या कर्मचारीसंख्येत आधीच मोठी घट झाली आहे. मे २०२५ मध्ये सुमारे १ लाख ६२ हजार असलेली कंपनीची पूर्णवेळ कर्मचारीसंख्या मे २०२६ अखेर सुमारे १ लाख ४१ हजारांवर आली आहे. म्हणजेच वर्षभरात जवळपास २१ हजार कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
हे ही वाचा:
अनिसिमोवा, मुचोवाहही दुसऱ्या फेरीत

पुराच्या पाण्यातून वाहून आलेले मासे खाल्यांने बिहारमधील अनेक लोक आजारी

जीडीपीची चढती कमान अन् एक बिनडोक प्रश्न…

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे, पण गुन्हेगारांवर कारवाई होणारच

दरम्यान, ओरॅकलकडून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाऊड तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. एआयच्या वाढत्या वापरामुळे कंपनीच्या कामकाजात मोठे बदल होत असून, त्याचा परिणाम मनुष्यबळाच्या गरजेवर होण्याची शक्यता आहे. कंपनीने यापूर्वीही एआयमुळे आपल्या कामकाजाच्या पद्धतीत बदल होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला एआय आणि क्लाऊडसाठी वाढता खर्च, तर दुसऱ्या बाजूला मनुष्यबळावरील खर्च कमी करण्याची रणनीती, अशी ओरॅकलची भूमिका दिसत आहे. मात्र, प्रस्तावित ७ ते १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरकपातीला कंपनीने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा