28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरविशेषस्वरा भास्करचे म्हणते, 'पद्मावत'मधले जौहरचे दृश्य स्त्रियांच्या भ्याडपणाचे!

स्वरा भास्करचे म्हणते, ‘पद्मावत’मधले जौहरचे दृश्य स्त्रियांच्या भ्याडपणाचे!

सोशल मीडियात तिच्यावर सडकून टीका

Google News Follow

Related

अभिनेत्री स्वरा भास्करने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटातील जौहरच्या दृश्यावर केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियात घमासान सुरू झाले आहे. त्यात राणी पद्मावतीसह इतर स्त्रियांच्या आगीत उडी घेण्याच्या म्हणजे जौहर करण्याच्या दृश्यामुळे स्वरा भास्करला राग आला आणि त्या महिलांना भ्याडपणा दाखवायला नको होता, असे वक्तव्य तिने केले. त्यावरून स्वरावर प्रचंड टीका होत आहे. स्वराने हे दृश्य पाहून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना खुले पत्र लिहिले होते, अशी आठवणही तिने सांगितली आहे.

स्वरा भास्कर नुकतीच दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तेथे तिने ‘पद्मावत’ चित्रपटाबाबत चर्चा केली. जौहरच्या दृश्याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी चित्रपट पाहत होते. त्यामध्ये जवळपास ८०० महिला जौहर करत आहेत. मी विचार करत होते की, जर मी बलात्काराची शिकार झाले असते, तर हा चित्रपट मला काय संदेश देत आहे? मला असे वाटले असते की मी भ्याड आहे, कारण माझा सन्मान वाचवण्यासाठी मी आत्महत्या केली. स्वरा भास्करने पुढे प्रश्न उपस्थित केला, आपण महिलांना हेच सांगू इच्छितो का की, बलात्कारानंतर जगण्याचा त्यांना अधिकार नाही? आपण असे म्हणत आहोत का की बलात्कार हा एखाद्या महिलेच्या आयुष्याचा अंत आहे?”

हे ही वाचा:

नेपाळमधील महापुरात मृतांचा आकडा १ हजार पार

४ सप्टेंबरला भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह झेपावणार

जीडीपीची चढती कमान अन् एक बिनडोक प्रश्न…

पंजाब विद्यापीठात अभाविपचा पुन्हा एकदा अध्यक्ष

स्वराने हेही स्पष्ट केले की, ती रागाच्या भरात घाईघाईने पत्र लिहित नाही. तिने सांगितले, “लोकांना वाटते की मी रागाच्या भरात अशी कामे करते. पण मी पाच दिवस वाट पाहिली. विचार केला की पाच दिवसांनंतरही माझी तीच भावना असेल, तरच मी लिहीन. त्यानंतर मी संजय लीला भन्साळी यांना खुले पत्र लिहिले.”

मात्र, स्वरा भास्करच्या या वक्तव्यावर माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर लिहिले, “जर निवड मृत्यू आणि विजेत्यांची गुलाम बनण्याच्या दरम्यान असेल, तर अनेक महिलांनी मृत्यूची निवड केली. काही महिला दुसरा पर्यायही निवडू शकल्या असत्या. मात्र, त्यांनी आपल्या इच्छेचा वापर केला. कोणी याच्याशी सहमत असो किंवा नसो, यावर चर्चा होऊ शकते, पण ती एक निवड होती. अशी निवड जी एका महिलेने केली. ती स्वीकारा.”

प्रियंका चतुर्वेदी यांनी पुढे लिहिले आहे की, “खरं सांगायचं तर, मला ‘पद्मावत’ चित्रपटातील ते दृश्य कदाचित सर्वात प्रभावी वाटले. महिला कोणाचीही गुलाम बनून राहू इच्छित नव्हत्या. जे आक्रमक त्यांच्याकडून संपूर्ण आयुष्य स्वतःच्या अधीन राहण्याची अपेक्षा करत होते, त्यामुळे त्यांनी आयुष्यातील कठीण परिस्थितीत एक कठोर निर्णय घेतला होता.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा