31 C
Mumbai
Monday, September 21, 2026
घरदेश दुनियानेपाळमधील महापुरात मृतांचा आकडा १ हजार पार

नेपाळमधील महापुरात मृतांचा आकडा १ हजार पार

सुमारे ४ हजार जण अद्याप बेपत्ता

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मृतांचा आकडा १ हजारांहून अधिक झाला आहे. नद्यांच्या काठावर वाहून आलेले मृतदेह अद्यापही सापडत आहेत. राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) मंगळवारी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १,००३ मृतदेह सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३२१ मृतदेह दक्षिण चितवन जिल्ह्यातून, तर त्यानंतर पूर्व नवलपरासीमधून २१६ मृतदेह सापडले आहेत.

माहितीनुसार, ५८३ परदेशी नागरिकांसह एकूण ३,९१६ जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. बेपत्ता व्यक्तींमध्ये नेपाळी लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांचे जवान तसेच इतर सरकारी कर्मचारीही आहेत. प्राधिकरणाच्या माहितीनुसार, भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या काठावरील विविध जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे ६३९ जण बेपत्ता आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शोध, बचाव आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे. या आपत्तीत आतापर्यंत २७९ जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींची माहिती संकलित करण्यासोबतच बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. शोध, बचाव आणि मदतकार्यासाठी एकूण २१,३१४ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये नेपाळी लष्कराचे ९,१९९, नेपाळ पोलिसांचे ७,९१२ आणि सशस्त्र पोलीस दलाचे ४,२०३ जवान आहेत.

ओळख पटू न शकलेल्या मृतदेहांना ओळख आणि योग्य व्यवस्थापनासाठी २१ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत ११,८८४ जणांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षा यंत्रणा हेलिकॉप्टरसह विविध साधनांचा वापर करत आहे.

हे ही वाचा:

इराणविरोधातील युद्धामुळे अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचा साठा घटला

मोदींसोबत पुतिन-जिनपिंग यांची दिलखुलास भेट; शहबाज शरीफ पाहतच राहिले

उत्तराखंडमध्ये मान्यता नसलेले मदरसे होणार बंद!

“दहशतवाद कोणासाठीही रणनीतिक साधन ठरू शकत नाही”

दरम्यान, नेपाळी लष्कराने सांगितलं की, परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने विविध जलविद्युत प्रकल्पांमध्ये शोध आणि बचावकार्य सुरू आहे. चिलिमे, लांगटांग, अपर त्रिशूली-१ आणि त्रिशूली-३ए यांसह इतर ठिकाणी संयुक्त बचाव मोहीम राबवली जात आहे. पूर आल्यानंतर तातडीने सुरू केलेल्या बचाव मोहिमेत जलविद्युत प्रकल्पांच्या परिसरातून २७९ जणांना जिवंत वाचवण्यात आलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा