30.4 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरक्राईमनामापाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शकांवर ड्रोनद्वारे कारवाई

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शकांवर ड्रोनद्वारे कारवाई

तिघांचा मृत्यू, १८ जखमी

Google News Follow

पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये (पीओजेके) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. रावलकोट शहरात पाकिस्तानी लष्कराकडून निदर्शकांवर गोळीबार आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, १८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. उमर फारूक चौक परिसरात ही घटना घडली. या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून निःशस्त्र आंदोलक आणि नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले जात आहे. रावलकोटमधील अनेक घरांना आग लागल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. घटनास्थळावर स्फोटकांचे तुकडेही आढळल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गोळीबाराचे आवाज ऐकू येत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, रावलकोटमध्ये सरकारी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत असून, घटनास्थळावरील माहिती बाहेर पोहोचवणेही कठीण झाले आहे. इंटरनेट सेवा बंद असतानाही आंदोलक रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत असल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

३३ वर्षांनंतर जंतरमंतर सर्वसामान्यांसाठी खुले!

लष्करासाठी गेमचेंजर ठरणार जीपीएस शिवाय ड्रोनला दिशा देणारे तंत्रज्ञान

राहुल गांधी पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार?

पंजाबमध्ये तस्करीचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त, १६ जण अटकेत

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जून २०२६ पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला स्वस्त वीज आणि स्वस्त दरात पीठ उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांवरून सुरू झालेल्या या आंदोलनाला आता राजकीय आणि प्रशासकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. विधानसभेतील प्रतिनिधित्व, स्थानिक संसाधनांवरील अधिकार आणि अधिक प्रशासकीय स्वायत्तता या मागण्याही आंदोलकांकडून करण्यात येत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा