28.8 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरबिजनेसऑगस्टमध्ये होंडाच्या दुचाकीच्या विक्रीत ८ टक्क्यांची वाढ

ऑगस्टमध्ये होंडाच्या दुचाकीच्या विक्रीत ८ टक्क्यांची वाढ

एका महिन्यात ५.७९ लाख दुचाकींची विक्री

Google News Follow

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या दुचाकी विक्रीत ऑगस्ट २०२६ मध्ये दमदार वाढ झाली आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये देशांतर्गत बाजार आणि निर्यात मिळून ५ लाख ७९ हजार १६२ दुचाकींची विक्री केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही विक्री ५ लाख ३४ हजार ८६१ युनिट्स होती. त्यामुळे कंपनीच्या एकूण विक्रीत ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात होंडाने ५ लाख १७ हजार ३२९ दुचाकी विकल्या, तर गेल्या वर्षी हा आकडा ४ लाख ८१ हजार २१ होता.

होंडाच्या विक्रीला निर्यातीचीही मोठी साथ मिळाली आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने ६१ हजार ८३३ दुचाकींची निर्यात केली, तर गेल्या वर्षी याच महिन्यात ५३ हजार ८४० दुचाकी निर्यात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निर्यातीत तब्बल १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ॲक्टिव्हा, शाइन, एसपी१२५ आणि युनिकॉर्न या लोकप्रिय मॉडेल्सना देशांतर्गत बाजारात मिळणारी मागणी तसेच परदेशातील वाढती मागणी यामुळे कंपनीच्या एकूण कामगिरीला बळ मिळाले आहे.
हे ही वाचा:
जयपूरच्या तबेल्यातील शाळेवर अखेर बुलडोझर

अल्पवयीन मुलीशी शरियानुसार निकाह केला तरी ‘पॉक्सो’ लागणार

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

ऑगस्टमध्ये १.९९ लाख कोटींचा विक्रमी जीएसटी महसूल जमा

एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत होंडाने २७ लाख ३३ हजार ७५८ दुचाकींची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २४ लाख २५ हजार ३९१ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच पाच महिन्यांत विक्रीत १३ टक्के वाढ झाली आहे. याच काळात देशांतर्गत विक्री २४ लाख ७ हजार ३०४ दुचाकींवर पोहोचली असून त्यात ११ टक्के, तर निर्यात ३ लाख २६ हजार ४५४ दुचाकींवर पोहोचून त्यात तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होंडाने १० नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यामुळे पुढील काळात कंपनीच्या दुचाकी विक्रीला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा