28 C
Mumbai
Tuesday, September 22, 2026
घरदेश दुनियाकराची अंधारात! १६-२४ तासांच्या वीजकपातीने नागरिक हैराण

कराची अंधारात! १६-२४ तासांच्या वीजकपातीने नागरिक हैराण

पाकिस्तानातील वीज संकट गडद

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पाकिस्तानातील वीज संकट अधिक गंभीर झाले असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरातील अनेक भागांना तब्बल १६ ते २४ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत असल्याचे समोर आले आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या वीजकपातीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांवर याचा मोठा परिणाम होत आहे.

कराचीतील नॉर्थ कराची, नाझिमाबाद आणि गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील नागरिकांनी १६ ते २४ तासांपर्यंत वीजकपात होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. वीजपुरवठ्यातील या मोठ्या खंडामुळे स्वयंपाक, आंघोळ, कपडे धुणे यांसारख्या दैनंदिन कामांपासून शिक्षण आणि रोजगारापर्यंत अनेक बाबींवर परिणाम होत आहे.

नागरिकांच्या समस्येवर नुकतीच कराची प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. ‘सिव्हिल सोसायटी कलेक्टिव्ह फॉर क्लीन एनर्जी फॉर कराची’च्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत सामाजिक संस्था आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ होणाऱ्या वीजकपातीवर चिंता व्यक्त केली. के-इलेक्ट्रिकच्या प्रकाशित वेळापत्रकानुसार ६१५ हून अधिक फीडरवर दररोज १२ तासांपर्यंत वीजकपात होऊ शकते, असा दावा करण्यात आला. यामुळे शहरातील जवळपास एकतृतीयांश फीडरवरील नागरिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाचे काझी खिझर यांनी दीर्घकाळ सुरू असलेल्या वीजकपातीचा सर्वाधिक फटका कामगार आणि गरीब कुटुंबांना बसत असल्याचे म्हटले. वीजपुरवठ्याच्या अनिश्चिततेमुळे मानसिक ताणही वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. वीज ही केवळ सुविधा नसून अत्यावश्यक सेवा म्हणून तिच्याकडे पाहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हे ही वाचा:

हवाई दलाच्या स्वदेशी शस्त्रसामर्थ्यात ‘खगांतक-243’ची भर

भारत-इराण जवळीकतेने अमेरिकेला मुरडा

कोलकात्यात तृणमूलचे कार्यालय फोडले

पाकिस्तानचे एफ-१६ पाडणारे अभिनंदन हवाई दलातून निवृत्त

दरम्यान, वीजकपातीविरोधात कराचीतील विविध भागांमध्ये नागरिकांनी आंदोलनही केले. २४ ऑगस्टपासूनच्या आठवड्यात ल्यारी आणि जुन्या शहरातील काही भागांत निदर्शने तसेच वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. कराचीतील वीज संकटामुळे पाणीपुरवठा, शिक्षण, उद्योग आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याने प्रशासन आणि वीज वितरण कंपनीवर नागरिकांचा दबाव वाढत आहे. परिणामी पाकिस्तानच्या आधीच अडचणीत असलेल्या ऊर्जा व्यवस्थेसमोरील संकट आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा