35 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरस्पोर्ट्सधोनीसाठी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ची भूमिका योग्य

धोनीसाठी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ची भूमिका योग्य

Google News Follow

महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी आयपीएल २०२६ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून एकही सामना खेळला नाही. त्यामुळे आयपीएल २०२७ मध्ये धोनीच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज एस. बद्रीनाथ यांनी धोनीने ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळणे सीएसकेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, असे मत व्यक्त केले आहे.

बद्रीनाथ यांनी सांगितले की, धोनी स्वतःला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून पाहत नाही. त्याला पूर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून खेळण्याची इच्छा आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वीही धोनीने आपली भूमिका स्पष्ट केली होती.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना बद्रीनाथ म्हणाले, “धोनीने मला वैयक्तिकरित्या सांगितले आहे की, तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही. तो स्वतःला पूर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून पाहतो. याचा अर्थ त्याला संपूर्ण २० षटके मैदानावर राहावे लागेल. त्यामुळे तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही. मात्र, त्याने तसे केले तर सीएसकेला रणनीतिक फायदा होऊ शकतो.”

धोनीच्या फिटनेसबाबतही बद्रीनाथ यांनी भाष्य केले. “धोनीचे शरीर दीर्घकाळ टिकू शकत नाही. फ्लेमिंग यांनीही याबाबत सांगितले आहे. तो केवळ १६व्या षटकानंतर फलंदाजीला येणार असेल आणि त्याचबरोबर यष्टीरक्षणही करणार असेल, तर त्याचा मैदानावरील सहभाग कमी राहील. अशा परिस्थितीत त्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणे अधिक योग्य ठरेल,” असे ते म्हणाले.

शिवम दुबेबाबतही सीएसके व्यवस्थापनावर टीका

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे शिवम दुबेच्या गोलंदाजीवर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, बद्रीनाथ यांनी हा दावा फेटाळून लावला.

ते म्हणाले, “शिवम दुबे भारतासाठी गोलंदाजी करतो, पण सीएसकेसाठी करत नाही. याचे कारण इम्पॅक्ट प्लेअरचा नियम नाही. यामागे सीएसके व्यवस्थापन आणि दुबेचा गोलंदाजीसाठी योग्य वापर न करणे हे कारण आहे. ते त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का वापरत आहेत? यासाठी नियमाला दोष देता येणार नाही.”

अकील हुसैनच्या वापरावरही प्रश्नचिन्ह

सीएसकेकडून अकील हुसैनच्या वापराबाबतही बद्रीनाथ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, अकीलला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून राखीव ठेवण्याऐवजी प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळायला हवे.

“अकील हुसैनचे प्लेइंग-११ मध्ये स्थान निश्चित असायला हवे. मात्र, CSK त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ठेवते. त्यानंतर फलंदाजी खराब झाली की ते अतिरिक्त फलंदाजाचा वापर करतात. त्यामुळे अकील हुसैन खेळत नाही. ही चुकीची रणनीती आहे. स्वतःच्या चुकीसाठी तुम्ही नियमाला दोष देऊ शकत नाही,” असे बद्रीनाथ यांनी स्पष्ट केले.

आयपीएल २०२७ मध्ये धोनी खेळणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृत चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, बद्रीनाथ यांच्या वक्तव्यामुळे धोनीच्या संभाव्य भूमिकेबाबतची चर्चा पुन्हा रंगली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा