35 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरराजकारणराहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

पंतप्रधान मोदींवर आरोप

Google News Follow

व्होट चोरीच्या आरोपानंतर आता राहुल गांधी यांनी फोन टॅपिंगचा नवा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेसाठी आणला आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच आपला फोन टॅप करत असल्याचा आरोप केला आहे. ‘माझ्या फोनमध्ये सर्व पुरावे आहेत आणि पंतप्रधानांना याची माहिती आहे,’ असा दावा करत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ या संवादात्मक सत्रात समर्थकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी एका वापरकर्त्याने त्यांना “मोदी म्हणतात की तुम्हाला परकीय मदत मिळत आहे. तुम्ही म्हणता की मोदी परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली आहेत. याचा पुरावा काय?” असा प्रश्न विचारला. यावेळी राहुल गांधी यांनी हातात मोबाइल धरून “पुरावा या फोनमध्ये आहे. पंतप्रधान माझा फोन टॅप करत असल्यामुळे त्यांना हे माहीत आहे,” असे म्हटले.

“पंतप्रधानांना याची जाणीव आहे कारण त्यांनी माझा फोन टॅप केला आहे. ज्या दिवशी ते समोरासमोर चर्चेसाठी तयार होतील, त्या दिवशी सर्वांना कळेल की परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण आहे, कोण देशद्रोही आहे आणि ते किती काळापासून देशद्रोही कारवायांमध्ये सामील आहेत,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे कायम

१९८४ दंगल पीडितांकडून सोनिया गांधींच्या पुस्तकाची होळी

मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभर ठप्प; आउटलुक, टीम्स, कोपायलटला फटका

राहुल गांधी यांनी यापूर्वीही फोन टॅपिंग आणि पेगासस स्पायवेअरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर आरोप केले होते. २०२३ मध्ये त्यांनी स्वतःसह अनेक राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस स्पायवेअर असल्याचा दावा केला होता. गुप्तचर यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी फोनवर काय बोलता, याबाबत सावध राहण्याचा इशारा दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, केंद्र सरकारने हे आरोप फेटाळले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा