33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरविशेष१९८४ दंगल पीडितांकडून सोनिया गांधींच्या पुस्तकाची होळी

१९८४ दंगल पीडितांकडून सोनिया गांधींच्या पुस्तकाची होळी

दंगलीच्या वर्णनावर, राजीव गांधींबाबतच्या भूमिकेवर आक्षेप

Google News Follow

१९८४ मधील शीखविरोधी दंगलीतील पीडितांच्या कुटुंबीयांनी आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या (DSGMC) सदस्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्राची प्रत जाळून निषेध व्यक्त केला. दिल्लीतील रकाबगंज गुरुद्वारात हा प्रकार घडला. पुस्तकातील दंगलीच्या घटनांचे वर्णन आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबतच्या भूमिकेवर आंदोलकांनी आक्षेप घेतला.

सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा उल्लेख भारताच्या इतिहासातील ‘दुःखद आणि लाजिरवाणा अध्याय’ असा केला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीसह देशाच्या विविध भागांत हिंसाचार उसळला आणि निष्पाप शीख नागरिकांना लक्ष्य करण्यात आले, असे त्यांनी लिहिले आहे. राजधानी दिल्लीतच दोन हजारांहून अधिक लोकांचा अत्यंत क्रूरपणे जीव गेला, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, या घटनांचे वर्णन करताना सोनिया गांधी यांनी पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची बाजू मांडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. राजीव गांधी यांच्या मनात शीख समुदायाविषयी द्वेष नव्हता; मात्र प्रशासन व्यवस्था कोलमडलेल्या एका असामान्य परिस्थितीत त्यांच्यावर देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली, असे सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे.

हे ही वाचा:

मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभर ठप्प; आउटलुक, टीम्स, कोपायलटला फटका

तृणमूलच्या सत्ताकाळातील माजी पोलीस अधिकाऱ्याची २.७८ कोटींची मालमत्ता जप्त

राजधानीत दृश्यमानता घटली

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

DSGMCचे अध्यक्ष हरमीत सिंह कालका आणि सरचिटणीस जगदीप सिंह कहलो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पुस्तकातील मांडणी ऐतिहासिक घटनांशी आणि शीख समुदायाने भोगलेल्या वेदनांशी सुसंगत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दंगलीला चार दशकांहून अधिक काळ उलटूनही पीडित कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही, असेही त्यांनी म्हटले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा