33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरस्पोर्ट्सदिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान

Google News Follow

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ चे वितरण करण्यात आले. बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि डेकॅथलॉनपटू तेजस्विन शंकर यांच्यासह १७ खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषक २०२५ जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अंतिम सामन्यात तिने भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीचा रॅपिड टायब्रेकरमध्ये १.५-०.५ असा पराभव केला होता. दुसरीकडे, तेजस्विन शंकरने राष्ट्रकुल स्पर्धेतील डेकॅथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

अर्जुन पुरस्कार मिळविणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये धावपटू मोहम्मद अजमल वरियाथोडी, रेस वॉकर प्रियंका गोस्वामी, बॉक्सर नरेंद्र, बुद्धिबळपटू विदित गुजराथी, पॅरा नेमबाज धनुष श्रीकांत, हॉकीपटू लालरेमसियामी आणि राजकुमार पाल, कबड्डीपटू सुरजीत आणि पूजा, पॅरा नेमबाज रुद्रांश खंडेलवाल, पॅरा अ‍ॅथलिट एकता भ्यान, रोव्हर अरविंद सिंह आणि नेमबाज अखिल श्योराण यांचा समावेश आहे.

अनुभवी फुटबॉलपटू इसायाह अरुमाइनयागम यांना अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) प्रदान करण्यात आला. तसेच अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक परवीर सिंह, बॉक्सिंग प्रशिक्षक छोटे लाल यादव आणि धर्मेंद्र सिंह यादव, नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले.

साहसी क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कामगिरीसाठी बलजीत कौर, स्कलजांग रिग्जिन, रिमो साहा आणि शिव प्रसाद चमोली यांना तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या माध्यमातून खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी, प्रशिक्षकांचे योगदान आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा