33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरक्राईमनामागोरेगावात पकडले तीन कोटींचे कोकेन

गोरेगावात पकडले तीन कोटींचे कोकेन

मध्य प्रदेशातील साथीदाराला अटक, आतापर्यंत २१ कोटींचा मुद्देमाल जप्त

Google News Follow

मुंबईतील अमली पदार्थ तस्करीविरोधात बांगूरनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत गोरेगाव पश्चिम परिसरातून सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण ४ किलो २२६ ग्रॅम ९७० मिलीग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे. या अमली पदार्थांची एकूण किंमत २१ कोटी १३ लाख ४८ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बांगूरनगर लिंक रोड पोलिस ठाण्याचे अमली पदार्थविरोधी पथक २ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास गोरेगाव पश्चिम येथील दक्षिण वाहिनी लिंक रोड परिसरात गस्त घालत होते. यावेळी शिवम सहकारी सोसायटीसमोर रस्त्यालगत एक संशयित व्यक्ती आढळून आली. फुलचंद ईश्वरदयाल कश्यप (वय ३१) असे त्याचे नाव असून, तो मालाड पश्चिम येथील राठोड व्हिलेज परिसरात राहत असल्याचे तपासात समोर आले.

हे ही वाचा:

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे कायम

१९८४ दंगल पीडितांकडून सोनिया गांधींच्या पुस्तकाची होळी

ओडिशात ८,५७१ कोटींचा तेलसाठा प्रकल्प

संभलमध्ये मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५.९७ ग्रॅम कोकेन आढळले. या कोकेनची किंमत सुमारे २ लाख ९८ हजार ५०० रुपये होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये तब्बल ३ किलो ५४ ग्रॅम वजनाचे कोकेन आढळून आले. त्याची किंमत सुमारे ३ कोटी ३६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी बांगूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०३९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान फुलचंद कश्यप याने मध्य प्रदेशातील मुजाहिद अली याच्यासोबत मिळून हा अमली पदार्थांचा व्यवसाय केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मुजाहिद अली यालाही अटक केली आहे.

दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेले कोकेन नेमके कुठून आणण्यात आले होते, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे मुंबईतील अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बांगूरनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा