33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरधर्म संस्कृती५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा

५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा

कुंडा येथे चार दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन

Google News Follow

उत्तर प्रदेशातील कुंडा येथील आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे अध्यक्ष रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया यांनी पाकिस्तानातून भारतात आलेल्या ५०० हिंदू शरणार्थींना श्रीराम कथेसाठी विशेष निमंत्रण दिले आहे. बेंती राजभवन येथील परेड ग्राउंडवर १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री या चार दिवसांच्या कार्यक्रमात श्रीराम कथेचे वाचन करणार आहेत.

राजस्थानमधील जोधपूर येथील शरणार्थी छावणीत राहणाऱ्या या कुटुंबांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या निवासासाठी कथा स्थळाजवळ विशेष तंबू उभारण्यात येत आहेत. तसेच भोजन आणि इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था केली जात आहे. या शरणार्थींना केवळ रामकथेत सहभागी करून न घेता प्रयागराजमधील संगम घाट, अयोध्या धाम आणि काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शनही घडवण्यात येणार आहे. यासाठी १० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे कायम

१९८४ दंगल पीडितांकडून सोनिया गांधींच्या पुस्तकाची होळी

मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभर ठप्प; आउटलुक, टीम्स, कोपायलटला फटका

तृणमूलच्या सत्ताकाळातील माजी पोलीस अधिकाऱ्याची २.७८ कोटींची मालमत्ता जप्त

पाकिस्तानी हिंदू शरणार्थींशी राजा भैया यांचे यापूर्वीपासून संबंध आहेत. २०२४ मध्ये त्यांनी जोधपूरमधील शरणार्थी छावणीला भेट देऊन या कुटुंबांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी त्यांना आर्थिक मदतही केली होती. दिल्लीतील मजनू का टीला परिसरात राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदू शरणार्थींनाही त्यांनी मदत केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा