31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरबिजनेसभारतीय वाहन उद्योगाची वेगवान घोडदौड कायम

भारतीय वाहन उद्योगाची वेगवान घोडदौड कायम

भारतीय अर्थव्यवस्थेला २२.७५ लाख कोटींचा ‘बूस्ट’

Google News Follow

भारतीय वाहन उद्योगाने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली असून, वाहन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील एकूण योगदान तब्बल २२.७५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. देशाच्या एकूण जीएसटी संकलनात वाहन उद्योगाचा वाटा सुमारे १५ टक्के असून, या क्षेत्रामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तीन कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ अर्थात सियामचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी सियामच्या वार्षिक अधिवेशनात ही माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय वाहन बाजाराने दमदार कामगिरी केली. प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीने प्रथमच ४६ लाखांचा टप्पा ओलांडला असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ७.९ टक्के वाढ झाली. प्रवासी वाहनांच्या निर्यातीतही मोठी वाढ झाली असून, ती ९.१ लाखांवर पोहोचली आहे. निर्यातीत १७.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

दुचाकींच्या विक्रीतही भारतीय बाजारपेठेने जोरदार कामगिरी केली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशात तब्बल २.१७ कोटी दुचाकींची विक्री झाली असून, त्यात मागील वर्षाच्या तुलनेत १०.७ टक्के वाढ झाली. दुचाकींच्या निर्यातीत तब्बल २३.४ टक्के वाढ होऊन ती ५१.८ लाखांवर पोहोचली. तीनचाकींची देशांतर्गत विक्री ८.४ लाखांवर गेली असून, त्यात १२.८ टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे तीनचाकींच्या निर्यातीत तब्बल ५०.१ टक्के वाढ झाली असून, निर्यात ४.६ लाखांवर पोहोचली. वाणिज्य वाहनांच्या देशांतर्गत विक्रीतही १२.६ टक्के वाढ झाली असून, एकूण विक्री १०.८ लाखांवर पोहोचली. या वाहनांच्या निर्यातीत १७.४ टक्के वाढ नोंदवण्यात आली असून, निर्यात ९५ हजारांवर पोहोचली आहे. या आकडेवारीवरून देशांतर्गत मागणीबरोबरच भारतीय वाहन उद्योगाची जागतिक बाजारपेठेतील पकडही मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
महापुरानंतर भारताकडे कोणतीही भरपाई मागितलेली नाही

७६९ कोटींच्या दारुगोळा खरेदी घोटाळ्यानंतर एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

GSLV-F17 चे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे कौतुक

नेपाळमध्ये दोन कामगारांची ९ दिवसांनी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून सुटका

दरम्यान, वाहन उद्योगाचा भर आता पर्यावरणपूरक आणि कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांकडे वाढत आहे. १ एप्रिल २०२५पासून वाहन उद्योगाने ई२० म्हणजेच २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्यास सक्षम वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. यामुळे खनिज तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारातही वेगाने वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १९.७ लाख असलेली इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी २०२५-२६ मध्ये २५ लाखांवर पोहोचली. म्हणजेच एका वर्षात ईव्ही नोंदणीत २४.७ टक्के वाढ झाली. वाढती वाहन विक्री, विक्रमी निर्यात, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर यामुळे भारतीय वाहन उद्योग देशाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनत असल्याचे सियामच्या आकडेवारीतून दिसून येते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा