29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरदेश दुनियानेपाळमध्ये दोन कामगारांची ९ दिवसांनी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून सुटका

नेपाळमध्ये दोन कामगारांची ९ दिवसांनी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून सुटका

बचाव मोहिमेत दिसला आशेचा किरण

Google News Follow

नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या जल प्रलयानंतर मोठ्या प्रमाणत वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे. अजूनही नेपाळमध्ये बचावकार्य सुरू असून जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचाव मोहिमेत अखेर आशेचा किरण दिसला आहे. रासुवा जिल्ह्यातील त्रिशूली 3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून बचाव पथकाला आत अडकलेल्या लोकांचे आवाज ऐकू आले आहेत. त्यानंतर काही तासांतच तब्बल नऊ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांची जिवंत सुटका करण्यात आली आहे.

नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी महापुरामुळे त्रिशूली नदी परिसरातील अनेक जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकल्पांमधील बोगद्यांमध्ये शेकडो कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्रिशूली 3A जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातून एकापेक्षा अधिक व्यक्तींचे आवाज ऐकू आल्याची माहिती बचाव पथकाला मिळाली. बचाव पथकाने बोगद्यातील लोकांना, “घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी आलो आहोत,” असे सांगितल्यानंतर आतून प्रतिसाद मिळाल्याचे राष्‍ट्रीय स्वतंत्र पक्षाचे खासदार आणि अभियंता श्रीराम न्यौपाने यांनी सांगितले.

कामगारांचा आवाज ऐकू आल्यानंतर नेपाळी लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाने बचावकार्य अधिक तीव्र केले. चिखल आणि मोठ्या प्रमाणात साचलेला ढिगारा हटवण्यासाठी जड यंत्रसामग्री आणि विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला. बचाव मोहिमेदरम्यान दोन कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. त्यांची ओळख संजय साह आणि कबीर महारजन अशी झाली आहे. संजय साह हे मेकॅनिकल फोरमन, तर कबीर महारजन हे मेकॅनिकल सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. दोघांच्या सुटकेनंतर बोगद्यात अजूनही काही लोक जिवंत अडकले असण्याची आशा निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

GSLV-F17 चे काउंटडाऊन सुरू; भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह झेपावणार

ड्रोनपासून रणगाड्यापर्यंत… बेल्जियमसोबतच्या करारांमधून स्वदेशी उत्पादनाला चालना

टीकाकारांनी समान गोष्टींची तुलना करायला हवी!

बलात्कार प्रकरणे मिटवण्यासाठी ५ कोटी? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह पत्नीवर आरोप

त्रिशूली 3A प्रकल्पात महापुरानंतर किमान ४० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. देशातील किमान सहा जलविद्युत प्रकल्पांमधून ९०० हून अधिक कामगार बेपत्ता असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. खराब हवामान, उद्ध्वस्त झालेली पायाभूत सुविधा आणि बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर साचलेला चिखल व दगड यामुळे बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा