29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरविशेषरविवारी चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान ५ तासांचा जम्बो ब्लॉक

रविवारी चर्चगेट-मुंबई सेंट्रलदरम्यान ५ तासांचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेचा ६ सप्टेंबरला जम्बो ब्लॉक

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर रविवारी, ६ सप्टेंबरला पश्चिम रेल्वेच्या जम्बो ब्लॉकचा परिणाम होणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क विभागाने याबाबत माहिती दिली.

ब्लॉकच्या काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या सर्व फास्ट लोकल गाड्या स्लो मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल सेवांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार असून, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकल गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकांवरच थांबवून परतीच्या दिशेने रवाना केल्या जाणार आहेत. त्यामुळे रविवारी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
हे ही वाचा:
मुंबई-दिल्लीपलीकडे होत आहे देशाचा आर्थिक विस्तार

हाँगकाँगला १३७ धावांनी धूळ चारत ‘भारताच्या शेरणी’ उपांत्य फेरीत

म्यानमारच्या विमानावरील ड्रोन हल्ल्यामागे अमेरिकन भाडोत्री सैनिकासह सहा युक्रेनियन?

वादातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून करत केली आत्महत्या

प्रभावित लोकल गाड्यांची सविस्तर माहिती उपनगरीय मार्गावरील सर्व स्थानकांच्या स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा