29 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरविशेषदिल्लीत विद्यार्थ्यांचे वसतिगृह असलेली इमारत कोसळून २ मृत्युमुखी

दिल्लीत विद्यार्थ्यांचे वसतिगृह असलेली इमारत कोसळून २ मृत्युमुखी

बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी पाच मजली पीजी इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या इमारतीत विद्यार्थी राहत असल्याने ढिगार्‍याखाली अनेक जण अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेत २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ६ ते ७ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश प्राप्त झाले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दल, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए), एमसीडी, कॅट्स आणि नागरी संरक्षण दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकांकडून ढिगारा हटवून अडकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

ही दुर्घटना दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. इमारतीचे नाव ‘हॉस्टेल डेज’ असल्याचे समोर आले असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी राहत होते. काही जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखालून काही विद्यार्थ्यांचे फोन येत असल्याची माहिती स्थानिक आमदार अनिल कुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अजूनही जिवंत व्यक्ती असण्याची शक्यता लक्षात घेऊन बचाव पथकांकडून अत्यंत काळजीपूर्वक शोधमोहीम राबवली जात आहे.
हे ही वाचा:
इशान किशनच्या शतकामुळे पूर्व विभाग मजबूत स्थितीत

भारताच्या ज्युनियर महिलांचा आशिया कप हॉकीत सलग दुसरा विजय

ऑपरेशन सिंदूरनंतर EOS-05 ही गरज होती

सात्विक-चिराग जोडीने पहिल्यांदाच जिंकली चायना मास्टर्स

दुर्घटनेची गंभीरता लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला नियोजित गोवा दौरा रद्द केला आणि दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसेच दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा करून बचावकार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून दुर्घटनाग्रस्त इमारतीलगतची इमारतही रिकामी करण्यात आली आहे. दरम्यान, इमारत कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इमारतीत तळघराचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बांधकामाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा