27.9 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरबिजनेसमॅकडोनाल्ड्सच्या इंटर्नचा पगार थकला

मॅकडोनाल्ड्सच्या इंटर्नचा पगार थकला

डिसेंबर २०२५पासून वेतन मिळाले नसल्याचा आरोप

Google News Follow

मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून रविवारी एक धक्कादायक पोस्ट करण्यात आली आणि काही वेळातच ती डिलीट करण्यात आली. या पोस्टमध्ये एका व्यक्तीने आपण मॅकडोनाल्ड्समध्ये इंटर्न म्हणून काम करत असल्याचा दावा करत, गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचे म्हटले. संबंधित व्यक्तीने आपला बॉस म्हणून अमित जोशी यांचे नाव घेतले असून, डिसेंबर २०२५ पासून पगार मिळालेला नसल्याचा आरोप केला. पगार न मिळाल्यामुळे आपल्याला ग्राहक सेवा आणि डिलिव्हरीसारखी दोन अतिरिक्त कामे करावी लागत असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. तसेच, आशियातील मॅकडोनाल्ड्सची अनेक सोशल मीडिया अकाउंट्स आपण सांभाळत असल्याचा दावाही करण्यात आला.
हे ही वाचा:
दिल्लीत पाच मजली इमारत कोसळून २ जणांचा मृत्यू

इशान किशनच्या शतकामुळे पूर्व विभाग मजबूत स्थितीत

भारताच्या ज्युनियर महिलांचा आशिया कप हॉकीत सलग दुसरा विजय

ऑपरेशन सिंदूरनंतर EOS-05 ही गरज होती

ही पोस्ट मॅकडोनाल्ड्सच्या अधिकृत अकाउंटवरून प्रसिद्ध झाल्याने सोशल मीडियावर काही क्षणांतच मोठी खळबळ उडाली. पोस्टमध्ये संबंधित बॉसचा फोटोही शेअर करण्यात आला होता. त्यानंतर पोस्ट डिलीट करण्यात आली, मात्र त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, अकाउंट हॅक किंवा कम्प्रोमाइज झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोस्ट नेमकी कोणी केली, संबंधित व्यक्ती खरोखरच मॅकडोनाल्ड्सची इंटर्न आहे का आणि पगार न मिळाल्याचा आरोप खरा आहे का, याची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही.

या घटनेमुळे कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटच्या सुरक्षेबरोबरच तरुण कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीवरही चर्चा सुरू झाली आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी कथित इंटर्नच्या धाडसाचे समर्थन केले, तर काहींनी सत्य समोर येण्यापूर्वी निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे म्हटले. विशेष म्हणजे, मॅकडोनाल्ड्स इंडियाकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा