29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरबिजनेससुरत बनतंय देशाचं नवं ‘स्पेंडिंग हब’

सुरत बनतंय देशाचं नवं ‘स्पेंडिंग हब’

सहा मोठ्या महानगरांनंतर सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ

Google News Follow

भारताच्या ग्राहक बाजाराचं चित्र वेगाने बदलत आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या सहा मोठ्या महानगरांनंतर आता सुरत देशातील सर्वात मोठं ग्राहक बाजारपेठ म्हणून पुढे आलं आहे. नव्या अहवालानुसार, सुरतमधील ग्राहक बाजाराचा आकार सुमारे ३४ अब्ज डॉलर, म्हणजेच जवळपास २.८ लाख कोटी रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे, हा आकार पुण्याच्या सुमारे २८ अब्ज डॉलरच्या ग्राहक बाजारापेक्षाही मोठा आहे.

सुरतच्या या झपाट्याने वाढलेल्या आर्थिक ताकदीमागे कापड उद्योग, हिरे व्यवसाय, वाढत्या रोजगाराच्या संधी, स्थलांतरित लोकसंख्या आणि वाढतं उत्पन्न हे प्रमुख घटक आहेत. शहरातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाचा विस्तार होत असल्याने नागरिकांचा खर्चही बदलत आहे. अन्न आणि दैनंदिन गरजांपलीकडे आता घर, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, शिक्षण, मनोरंजन, रेस्टॉरंट आणि जीवनशैलीशी संबंधित वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.
हे ही वाचा:
‘झूठ की गूँज’ कितीही मोठी असेल, पण तरुण ऐकणार सत्याचा आवाज!

‘सर तन से जुदा’ ची तुलना ‘जय श्री राम’ घोषणेशी होऊ शकत नाही!

मेट्रो सिनेमाजवळ १०.६४ लाखांच्या बनावट नोटा जप्त

काँग्रेसचा पचका; हल्दवानी ‘शुद्धीकरण’ प्रकरणाची याचिका काढली निकाली

देशातील टॉप १०० शहरांचा एकत्रित ग्राहक खर्च तब्बल ८४४ अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे ७४.५ लाख कोटी रुपये आहे. या शहरांमध्ये देशाच्या तुलनेने कमी लोकसंख्येचा वाटा असला, तरी देशाच्या एकूण ग्राहक खर्चाचा जवळपास एक-तृतीयांश हिस्सा याच शहरांमधून येतो. या शहरांमधील घरगुती खर्चाची वाढ वार्षिक १०.४ टक्के आहे, जी देशाच्या सरासरी वाढीपेक्षा अधिक आहे.

उत्पन्न वाढल्यामुळे खर्चाची रचनाही बदलली आहे. टॉप १०० शहरांमध्ये अन्नावरील खर्चाचा वाटा गेल्या दशकात सुमारे ३८ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. म्हणजेच मूलभूत गरजांवरील खर्चाचा वाटा कमी होत असून, इतर वस्तू आणि सेवांवर खर्च करण्याची क्षमता वाढत आहे.

सुरतमध्ये वीकेंडच्या खरेदीलाही मोठी चालना मिळत आहे. शहरातील शनिवार-रविवारच्या खर्चाचा गुणक २.४४ पट असल्याने रिटेल, मनोरंजन आणि सेवा क्षेत्रासाठी सुरत महत्त्वाचं बाजारपेठ बनत आहे. विशेष म्हणजे, सुरत आणि वडोदरा येथे ९२ टक्के कुटुंबं आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत करतात. त्यामुळे वाढता खर्च आणि मजबूत बचत यांचा समतोलही दिसून येतो.

सुरतचा हा उदय भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेतील मोठा बदल दर्शवतो. आता देशाच्या आर्थिक वाढीची आणि ग्राहक बाजाराची ताकद केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नसून, सुरतसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांकडेही ती वेगाने सरकत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा