26 C
Mumbai
Sunday, September 13, 2026
घरक्राईमनामामेट्रो सिनेमाजवळ १०.६४ लाखांच्या बनावट नोटा जप्त

मेट्रो सिनेमाजवळ १०.६४ लाखांच्या बनावट नोटा जप्त

ठाण्यातील तरुणाला अटक

Google News Follow

Related

भारतीय चलनातील उच्च दर्जाच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या ठाण्यातील तरुणासह एका महिलेला मुंबई गुन्हे शाखेने मेट्रो सिनेमाजवळ ताब्यात घेतले. दोघांकडून पाचशे रुपयांच्या तब्बल २,१२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, त्यांची दर्शनी किंमत १० लाख ६४ हजार रुपये आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दानिश खान (३८) याला अटक करण्यात आली आहे. तर रुकसाना (५५) हिला नोटीस बजावून सोडण्यात आले.

दानिश खान हा कोपरखैरणे येथे राहत असून, तो काकांच्या शू कारखान्यात काम करत होता. रुकसाना ही कुर्ला पश्चिम येथील कपाडिया नगर परिसरात राहत असून, ती ट्युशन टीचर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईत मेट्रो सिनेमाजवळ दोन व्यक्ती बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-२चे प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी सकाळी मेट्रो सिनेमाजवळ सापळा रचला.

हे ही वाचा:

शीतल देवीची फायनलमध्ये धडक

गारद्याचे बंड घडवेल महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

दिशा सालियन प्रकरणात सचिन वाझे होणार साक्षीदार?

आशिया कप फायनलआधी ट्रॉफीचा पेच!

संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर पोलिसांनी दोघांना हटकले. पोलिसांची चाहूल लागताच दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हे शाखेच्या युनिट कार्यालयात आणले. तेथे झडती घेतली असता दोघांकडे पाचशे रुपयांच्या २,१२८ उच्च दर्जाच्या बनावट नोटा आढळून आल्या.

गुन्हे शाखेने या नोटा जप्त करून आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट नोटा राज्याबाहेरून मुंबईत आणण्यात आल्या होत्या. मुंबईत त्यांची विक्री करण्याचा कट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

खऱ्या नोटेच्या बदल्यात दोन बनावट नोटा

जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांच्या व्यवहाराची पद्धतही पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पाचशे रुपयांची एक खरी नोट दिल्यास त्याच्या बदल्यात पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या नोटा नेमक्या कुठून आणण्यात आल्या, त्यामागे कोणाचे नेटवर्क आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा