29 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरक्राईमनामाआणखी एक गणेशमूर्ती कोसळली, पण जीवितहानी नाही

आणखी एक गणेशमूर्ती कोसळली, पण जीवितहानी नाही

कुर्ल्यात घडली घटना

Google News Follow

Related

धारावीतील प्रेमनगर येथील ओम शक्ती फाउंडेशनची १५ फूट उंच गणेशमूर्ती बैलबाजार, व्ही. बी. नगर येथून ट्रॉलीतून नेली जात असताना शीतल तलावाजवळ दुर्घटना घडली.स्पीड ब्रेकरवरून ट्रॉली नेत असताना अचानक मूर्ती ट्रॉलीवरून खाली पडली. या दुर्घटनेत गणेशमूर्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मूर्ती ट्रॉलीवरून खाली पडताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत ट्रॉलीजवळ असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा:

‘दीपस्तंभ’ने दिली साथ; दिव्यांगत्वावर केली मात

नोकरी सोडा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!

गारद्याचे बंड घडवेल महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

दिपके बोस्टनमध्ये धुणीभांडी करत होता काय?

दरम्यान, नुकसान झालेली गणेशमूर्ती शीतल तलाव येथे विसर्जित करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आकाराच्या मूर्तींची वाहतूक करताना आवश्यक खबरदारी न घेतल्यास अशा दुर्घटना घडण्याची शक्यता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
काही दिवसांपूर्वी भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले होते. या घटनेनंतर गणेशमूर्तींची वाहतूक, ट्रॉलीची सुरक्षितता आणि रस्त्यावरील स्पीड ब्रेकर याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यातच शीतल तलावाजवळ १५ फुटांची गणेशमूर्ती ट्रॉलीवरून पडल्याने गणेशमूर्तींच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा