29.3 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरसंपादकीयदिपके बोस्टनमध्ये धुणीभांडी करत होता काय?

दिपके बोस्टनमध्ये धुणीभांडी करत होता काय?

Google News Follow

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे नवनियुक्त सीईओ निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांचा एक फेक व्हिडियो व्हायरल झाला. या व्हिडीयोमध्ये ते डोक्यावर दारुचा ग्लास घेऊन नाचताना दाखवले आहेत. एका पाकिस्तानी फेसबुक पेजवर पोस्ट केलेला हा व्हीडीयो कॉकरोच अभिजीत दिपकेने शेअर केला. बोस्टन युनिवर्सिटीत तो फक्त धुणीभांडी करायला गेला होता, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. देशात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबाबत सतत नकारघंटा वाजवणाऱ्या लोकांचा उल्लेख अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नाराज फुफा’ असा केला होता. समस्या अशी आहे की, या फुफा मंडळींनी गेल्या काही वर्षांत भारतात त्यांची पिलावळ मोठ्या संख्येने निर्माण केली आहे. नदी तलावांच्या पर्यावरणाची वाट लावणाऱ्या सकर माऊथ कॅटफिशसारखी ती वाढत चालली आहे.

डोक्यावर दारुचा ग्लास घेऊन नाचणाऱ्या व्यक्तिचा व्हिडियो दिपकेने शेअर केला होता. नाचणारी व्यक्ति जितेंद्र मिश्रा असल्याचा दावा मूळ व्हिडीयोमध्ये केला होता. राम मंदिराच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्यानंतर दारु पिऊन केलेले सेलिब्रेशन आहे, असे या व्हिडीयोत भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा व्हिडियो फेक असून त्यातील व्यक्ती जितेंद्र मिश्रा नसल्याचे स्पष्ट झाले. लोकांनी सोशल मीडियावर लाथा घातल्यानंतर त्याने ही पोस्ट डीलीट केली.

ही पोस्ट शेअर करतान व्हीडीयो फेक असू शकतो, असा संशय दिपकेला आला नाही. त्यामुळेच तो बोस्टनला धुणीभांडी करायला गेला होता, असा आमचा संशय आहे. सोशल मीडियाचे काम पाहणाऱ्या तज्ज्ञांसाठी असे व्हिडीयो ओळखणे ही अगदीच सामान्य बाब असते. विशेष करून एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तिबाबत असे व्हिडियो असतील तर अपलोड करताना त्याबाबत अधिक खबरदारी घेतली जाते. जर व्हीडियोचे मूळ पाकिस्तानात असेल तर खबरदारी जरा जास्तच घेतली जाते. दिपकेची बाब वेगळी आहे. तो पाळीव आहे. दुसऱ्याची बदनामी करून पोट भरण्याचा धंदा त्याने स्वीकारला आहे.

पहिल्या पोस्टबाबत गदारोळ झाल्यानंतर त्याने दुसरी पोस्ट अपलोड केली. ‘कोणाच्या व्यक्तिगत बाबींबाबत बोलायचे नाही. परंतु त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ति कोण आहे, यावर धर्माच्या ठेकेदारांची प्रतिक्रिया निश्चित होते, हा दांभिकपणा मला उघड करायचा होता.’ दिपके हा ‘हॅबिच्युअल ऑफेंडर’ आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अण्णा हजारे यांचा उल्लेख ‘बुढ्ढा’ असा केला होता. घरी वडीलांचा उल्लेखही तो असाच करत असावा. पत्रकारांनी याबाबत धारेवर धरल्यानंतर, ‘राजकीय नेताओ जैसी पॉलिश बाते करने की मुझे आदत नही’, असा खुलासा त्याने केला होता. दिपकेच्या मालकांना त्याच्यापासून दुर्गंधीच पसरवाची असल्यामुळे तो प़ॉलिश नसणे हे त्यांच्या उपयोगाचेच आहे.

बोस्टन युनिवर्सिटीत पब्लिक रिलेशन, स्ट्रेटेजिक कम्युनिकेशन्स, डीजिटल कम्युनिकेशन्सचा अभ्यास करायला दिपके गेला होता. तिथे त्याला डिग्री मिळालेली नाही. मिळाली असती तर त्याने ती झाकून ठेवली नसती. तिथे तो शिकला फक्त अफवा पसरवण्याचे तंत्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्वाच्च शिवीगाळ करणारी रुचिका सिंग, निशू आझाद आणि दिपकेमध्ये काहीही फरक नाही. दिपके हा व्हाईट कॉलर असल्याचा दावा करणारा लफंगा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाराज फुफांबाबत केलेले विधान सध्या प्रचंड गाजते आहे. नवी दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बोलताना मोदी यांनी हे विधान केले होते. फुफा म्हणजे वडीलांच्या बहिणीचा नवरा. घरच्या लग्नात ही फुफा मंडळी कायम नाराज असतात. सतत नकारात्मक बोलत असतात. नकारघंटा वाजवणारे हे फुफा प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध करत असतात. राम मंदिरापासून बुलेट ट्रेनपर्यंत आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपासून सेमी कण्डक्टरपर्यंत प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध करणाऱ्या फुफांची संख्या देशात कमी नाही. संख्यात वाढती राहावी म्हणून या फुफांनी गेल्या काही वर्षात दिपकेसारखी पिलावळही निर्माण केली आहे.

दिपकेने जी पोस्ट टाकली, त्यात हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा अपमान करण्यात आलेला आहे. पाकिस्तानबाबत प्रचंड प्रेम असल्यामुळे हे स्वाभाविकही आहे. जितेंद्र मिश्रा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या काळात देशासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. राम मंदिराबाबत दिपकेच्या भावना काय हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. धर्माच्या ठेकेदारांचा दांभिकपणा उघड करण्याच्या हेतूने आपण ही पोस्ट केली असे दिपके म्हणाला आहे. खरे तर यासाठी दारुचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या दुसऱ्या कोणाचा व्हिडीयो सोशल मीडियावर टाकण्याची गरज नव्हती. दिपकेला स्वत:च्या बापाचा व्हिडीयो अपलोड करता आला असता. त्यातूनही तोच संदेश देता आला असता.

हे ही वाचा:

आधीच्या सरकारांनी १० वर्षांत ५० हजार शौचालयेही बांधली नाहीत!

पिकलबॉलमध्ये भारताची पदकांची लयलूट

सुरत बनतंय देशाचं नवं ‘स्पेंडिंग हब’

मेट्रो सिनेमाजवळ १०.६४ लाखांच्या बनावट नोटा जप्त

 

अयोद्धेत राम मंदिराच्या उभारणीला ज्यांनी ज्यांनी विरोध केला. त्यात दिपकेचे राजकीय पितृत्व असलेल्या अरविंद केजरीवाल याचाही समावेश आहे. दिपकेला त्याचे स्वातंत्र्य नाही. तो पाळीव आहे. मालक म्हणेल तिथे जाऊन तंगडे वर करायचे, हा त्याचा धर्म आहे. राम मंदिराबाबत या सगळ्या गँगला पोटदुखी आहे. कारण त्यांच्या मालकांना आहे. मंदिर उभारून रोजगार मिळणार आहेत का? मंदिरच का, हॉस्पिटल का नाही? असे प्रश्न विचारून ज्यांनी मंदिराला विरोध केला. त्यांनीच दिपके सारख्या पोटार्थींची एक नवी फळी निर्माण केली आहे, जे मंदिराबाबत पोटदुखी बाळगतात. मंदिराबाबत सतत अप्रचार करत असतात.

अरविंद केजरीवाल यांनी अपप्रचार करणारे असे पोटार्थी मोठ्या संख्येने निर्माण केले. शिव्या घालून पोट भरणे, अफवा पसवरून पोट भरणे, हा ज्यांनी चरितार्थाचा उद्योग बनवला. दिपके या टोळीचा चेहरा बनला आहे. तो सतत खोटं बोलतो, पकडला गेला की एक विषय सोडायचा, दुसऱ्या विषयाबाबत टकळी सुरू करायची. हा त्याचा नेहमीचा धंदा. ही एक इको सिस्टीम आहे, जी देशात वाळवी सारखे काम करते. अयोद्धेतही एक वेगळी इको सिस्टीम निर्माण झाली आहे. एका मंदिराने ही इको सिस्टीम बनवलेली आहे. निव्वळ श्रद्धेच्या जोरावर ही इको सिस्टीम उभी राहिली आहे. जी देशाच्या अर्थकारणाला आधार देते आहे. हजारो रोजगार निर्माण करते आहे. उत्तर दक्षिण जोडण्यासाठी. देशाला एकसंध बनवण्यासाठी योगदान देते आहे.

एका मंदिरामुळे आजूबाजूच्या कित्येक किलोमीटरच्या परिसरात पर्यटन उद्योगाला प्रचंड चालना मिळाली आहे. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाच्या दिशेने देशभरातून खच्चून भरलेली विमाने जात असतात. तिथे किती हॉटेल उभी राहिली? जमिनीच्या किमती वाढल्या? याची तर मोजदादच नाही.

मंदिर उभारून रोजगार वाढणार आहेत काय? असे प्रश्न विचारणाऱ्यांची थोबाडे फुटली तरी प्रश्न काही बंद होत नाहीत. राम मंदिराचा द्वेष कमी होत नाही. उलट द्वेष करणाऱ्यांची पिलावळ वाढते आहे. दिपकेने जी पोस्ट केली, त्यात हाच द्वेष दिसलेला आहे. ही एक वेगळीच प्रजाती आहे. या प्रजातीची लक्षणे लक्षात घ्या, कर्नाटकातील एक काँग्रेस नेता बसवराज रायरेड्डी म्हणतो, इस्लाम हा श्रेष्ठ धर्म आहे. मला मक्केला जायचे आहे. परंतु त्यासाठी इस्लाम स्वीकारावा लागेल. इस्लामचे पोवाडे गायचे, मक्केचे कौतूक करायचे आणि हिंदूंना अपमानित करायचे, राम मंदिराचा विरोध करायचा, हे यांचे धंदे.

हे धंदे ही मंडळी सतत करत असतात. भारतात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा राहतो, तेव्हा विचारायेच एवढ्या उंच पुतळ्याची गरज काय? परंतु तेच दुबईत बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत पाहायला जातात. बुर्ज खलिफा पाहयला दरवर्षी येणाऱ्या लोकांची सरासरी संख्या १७ दशलक्ष इतकी आहे. अमेरिकेत गेल्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायला धावतात. फ्रान्सला गेल्यावर आयफेल टॉवर पाहायला जातात. हे तेच लोक आहेत, जे शहाजहानने ढापलेल्या ताजमहालचे कौतुक करतात. परंतु राम मंदिराचे यांना वावडे असते.

यांची तुलना फक्त सकर माऊथ कॅट फिश बरोबरच होऊ शकते. हे मासे जलस्त्रोतातील शेवाळ आणि अन्य खाद्य भस्म्या झाल्यासारखे खातात. अन्य माशांची अंडीही खातात. त्यामुळे अन्य माशांची संख्या झपाट्याने कमी होऊन यांची संख्या बेसुमार वाढते आहे. भारतातील अनेक राज्यात सध्या या माशांचा धुमाकूळ सुरू आहे. मच्छिमार धास्तावले आहेत. कारण हे मासे अनावश्यक असतात. बाजारात त्यांना किंमत नसते. मासे पकडण्याच्या जाळ्यांचे नुकसान करतात. नदी किनाऱी त्यांनी निर्माण केलेल्या बिळांमुळे किनाऱ्याची धूप होते. त्यांच्यामुळे जल पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत. त्यामुळे हे मासे नष्ट करण्यासाठी अनेक ठिकाणी मोहीमा हाती घेतल्या जात आहेत.

भारतातील फुफा आणि त्यांच्या पिलावळीची समस्या संपुष्टात आणण्यासाठी असाच काही तरी जालीम प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा