28 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरबिजनेसआयफोन १८ प्रोची उद्या ग्रँण्ड एन्ट्री

आयफोन १८ प्रोची उद्या ग्रँण्ड एन्ट्री

कॅमेरा, चिप अन् बॅटरीमध्ये असणार मोठे बदल!

Google News Follow

Related

अ‍ॅपलच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून, बहुप्रतिक्षित आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्स उद्या, ९ सप्टेंबरला सादर होणार आहे. ‘सरप्राईज अँड शाईन’ या विशेष कार्यक्रमात अ‍ॅपल आपल्या नव्या उत्पादनांची घोषणा करणार असून, भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं आहे.

यंदाच्या आयफोनमध्ये सर्वात मोठा बदल कॅमेऱ्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयफोन १८ प्रो मालिकेत व्हेरिएबल अ‍ॅपर्चर कॅमेरा दिला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे परिस्थितीनुसार कॅमेऱ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण नियंत्रित करता येईल. त्याचा फायदा विशेषतः कमी प्रकाशातील छायाचित्रण, पार्श्वभूमीचा धूसरपणा आणि फोटोच्या गुणवत्तेला होऊ शकतो. हा कॅमेरा केवळ प्रो मॅक्स मॉडेलमध्ये मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
संयुक्त राष्ट्राच्या नव्या नकाशात अरुणाचल, अक्साई चीन स्वतंत्र प्रदेश

मुंबईत मोदींच्या दौऱ्याआधी बंदुकीसह सापडला नकली ‘पीएमओ अधिकारी’

पिकलबॉलमध्ये भारताची पदकांची लयलूट

ऍमेझॉन, इन्स्टामार्टच्या गोदामांतून १.३८ कोटींचे मुदतबाह्य अन्न जप्त

कामगिरीच्या बाबतीतही आयफोन १८ प्रोमध्ये मोठं अपग्रेड अपेक्षित आहे. या फोनमध्ये ए२० प्रो चिप मिळण्याची शक्यता असून, ती दोन नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित असू शकते. त्यामुळे फोनचा वेग आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अ‍ॅपलचा सी२ मॉडेम मिळू शकतो, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

डिझाइनमध्ये डायनॅमिक आयलंड आणखी लहान होण्याची चर्चा आहे. तर प्रो मॅक्समध्ये मोठी बॅटरी मिळू शकते. मात्र या नव्या तंत्रज्ञानामुळे किंमतही वाढण्याची शक्यता आहे. भारतात आयफोन १८ प्रोची किंमत सुमारे १ लाख ४५ हजार रुपयांपासून, तर प्रो मॅक्सची किंमत १ लाख ६० हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

विशेष म्हणजे याच कार्यक्रमात अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन, नवीन अ‍ॅपल वॉच आणि एअरपॉड्सही सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा अ‍ॅपल कार्यक्रम तंत्रज्ञानविश्वासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा