31 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरबिजनेसआयफोनचा नवा अवतार! २.९९ लाखांचा फोल्डेबल ‘ऍपल ड्युओ’

आयफोनचा नवा अवतार! २.९९ लाखांचा फोल्डेबल ‘ऍपल ड्युओ’

आयफोनपासून वॉचपर्यंत अनेक मोठी उत्पादने सादर

Google News Follow

Related

ऍपलने आपल्या विशेष लॉन्च इव्हेंटमध्ये एकाच वेळी अनेक मोठी उत्पादने सादर करत टेक विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. कंपनीने पहिला फोल्डेबल आयफोन आयफोन ड्युओ (iPhone Duo), त्यासोबत आयफोन १८ प्रो (iPhone 18 Pro), आयफोन १८ प्रो मॅक्स (iPhone 18 Pro Max), ऍपल वॉच सिरीज १२ (Apple Watch Series 12), ऍपल वॉच अल्ट्रा ४ (Apple Watch Ultra 4) आणि एअरपॉड्स ५ (AirPods 5) ही नवी उत्पादने सादर केली आहेत. यातील आयफोन ड्युओ हे कंपनीच्या आयफोन इतिहासातील सर्वात मोठ्या डिझाइन बदलांपैकी एक मानले जात आहे.

आयफोन ड्युओची किंमत तब्बल २.९९ लाख रुपये

ऍपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची भारतातील सुरुवातीची किंमत २,९९,९०० रुपये आहे. हा फोन २५६ जीबी, ५१२ जीबी, १ टीबी आणि तब्बल २ टीबी स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘स्टार व्हाइट’ आणि ‘नाईट स्काय’ या दोन रंगांमध्ये फोन मिळेल. भारतात यासाठी प्री-ऑर्डर १६ ऑक्टोबरपासून, तर विक्री २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

आयफोन ड्युओ उघडल्यानंतर ७.६ इंचांचा इनर डिस्प्ले, तर फोल्ड केल्यानंतर ५.४ इंचांचा आउटर डिस्प्ले मिळतो. दोन्ही स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो समान ठेवण्यात आला आहे. इनर स्क्रीनला नॅनो-टेक्सचर फिनिश देण्यात आली असून, त्यामुळे स्क्रीनवरील चमक आणि क्रीजची जाणीव कमी होण्यास मदत होते. फोनमध्ये ए२० प्रो (A20 Pro) चिप, ऍडव्हान्स्ड थर्मल मॅनेजमेंट सिस्टम आणि ड्युअल-बॅटरी आर्किटेक्चर देण्यात आले आहे. कॅमेरा विभागात ४८ मेगापिक्सेलचा फ्यूजन मेन (Fusion Main) आणि ४८ मेगापिक्सेलचा फ्यूजन अल्ट्रा वाइड (Fusion Ultra Wide) कॅमेरा देण्यात आला आहे. फोल्डेबल डिझाइनमुळे कॅमेरा वापरण्याचे काही नवीन पर्यायही मिळतात.

आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्सही लाँच

ऍपलने आयफोन १८ प्रो आणि आयफोन १८ प्रो मॅक्स हे दोन प्रीमियम मॉडेल्सही लाँच केले आहेत. भारतात आयफोन १८ प्रोची सुरुवातीची किंमत १,६४,९०० रुपये, तर आयफोन १८ प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत १,७९,९०० रुपये आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ए२० प्रो चिप देण्यात आली असून कॅमेरा, बॅटरी आणि एआय क्षमतांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या मॉडेल्समध्ये २५६ जीबीपासून २ टीबीपर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. भारतात या दोन्ही फोनसाठी प्री-ऑर्डर १२ सप्टेंबरपासून, तर विक्री १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

ऍपल वॉच आणि एअरपॉड्सलाही नवे अपग्रेड

आयफोनसोबत ऍपलने ऍपल वॉच सिरीज १२ आणि ऍपल वॉच अल्ट्रा ४ देखील सादर केले. दोन्ही घड्याळांमध्ये नवीन एस११ (S11) चिप आणि आरोग्यविषयक मॉनिटरिंगसाठी सुधारित फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय एअरपॉड्स ५ देखील लाँच करण्यात आले आहेत. नव्या एअरपॉड्समध्ये ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation) सह ऑडिओ अनुभवात सुधारणा करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दुबईचा व्हिडीओ दिल्ली विमानतळाचा म्हणून पसरवला; ६३ खात्यांवर कारवाई

ब्रिक्सच्या व्यासपीठावर मोदी-जिनपिंग भेटणार! गलवाननंतर प्रथमच आमनेसामने चर्चा

अफगाण वैद्यकीय विद्यार्थ्यांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश

मुंबई विमानतळाजवळील अनधिकृत मशिदीवर चालणार बुलडोझर

ऍपलच्या नव्या उत्पादनांवर प्रीमियम फोकस

या संपूर्ण लॉन्चमधून ऍपलने प्रीमियम डिव्हाइस आणि एआय-केंद्रित अनुभवावर अधिक भर दिल्याचे दिसते. विशेषतः आयफोन ड्युओच्या माध्यमातून कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाजारात प्रवेश केला आहे. अॅपलच्या मते, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रितपणे विकसित करून फोल्डेबल फोन वापरण्याचा अनुभव नव्याने तयार करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा