28 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरविशेषमुंबई विमानतळाजवळील अनधिकृत मशिदीवर चालणार बुलडोझर

मुंबई विमानतळाजवळील अनधिकृत मशिदीवर चालणार बुलडोझर

एमएमआरडीएकडून कारवाईचे निर्देश

Google News Follow

Related

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ जवळील व्हीआयपी आगमन आणि टॅक्सी थांबा परिसरातील एका मशिदीच्या बांधकामावरून आता वाद निर्माण झाला आहे. या बांधकामासंदर्भात महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच एमएमआरडीएने महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. संबंधित संरचनेसाठी एमएमआरडीएकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधीचे पत्र शेअर करत माहिती दिली असून कारवाईची मागणी केली होती.

एमएमआरडीएने ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू झा यांना हे पत्र पाठवले आहे. विमानतळाच्या अधिसूचित क्षेत्रातील टर्मिनल-२ च्या व्हीआयपी आगमन आणि टॅक्सी थांब्याजवळ असलेल्या या संरचनेबाबत तक्रार प्राप्त झाल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या पत्रानुसार, संबंधित संरचनेला किंवा मशिदीला प्राधिकरणाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, या अधिसूचित क्षेत्रासाठी असलेल्या एकात्मिक विकास आराखड्यात सार्वजनिक प्रार्थनास्थळासाठी कोणतीही तरतूद, आरक्षण, जागेचे वाटप किंवा विशिष्ट जागेचे निर्धारण करण्यात आलेले नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

एमएमआरडीएने पत्रात म्हटले आहे की, अधिसूचित क्षेत्रातील विमानतळाच्या नियोजन, विकास, बांधकाम आणि देखभालीची जबाबदारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडकडे आहे. त्यासोबतच पायाभूत सुविधा, विमानतळाशी संबंधित सुविधा आणि इतर आवश्यक सुविधांच्या विकासाची जबाबदारीही एमआयएएलकडे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने सदर संरचना किंवा मशिद हटवण्याबाबत नियमानुसार आवश्यक पुढील कारवाई करण्याचे निर्देश एमआयएएलला दिले आहेत. तसेच, करण्यात आलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल लवकर सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सेन्सेक्स ८१३ अंकांनी कोसळला

प्रा.शोभिता जैन; हेवा वाटावे असे लखलखीत आयुष्य…

अमेरिका-इराण संघर्षात पाकिस्तानची होतेय ‘तारेवरची कसरत’

पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदीवरून वाद

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील परिसरात मशीद नेमकी कधी उभारण्यात आली, ती कोणी उभारली आणि त्यासाठी इतर कोणत्याही यंत्रणेची परवानगी घेण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी ‘मुंबई विमानतळावरील लँड जिहाद’ असा दावा करत या मुद्द्याला वाचा फोडली होती. तसेच या अनधिकृत मशिदीवर कारवाई केली जावी यासाठी कारवाईची मागणी केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा