28 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरबिजनेस“हा पुरस्कार माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान”

“हा पुरस्कार माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान”

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

ब्रिटनच्या संसदेतील प्रतिष्ठित हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन पुरस्काराने गौरव करण्यात आला. नागरिककेंद्री प्रशासन, सामाजिक कल्याण आणि नाविन्यपूर्ण शासनपद्धतीसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. या वेळी शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार, जय महाराष्ट्र’ अशा मराठमोळ्या अभिवादनाने केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत त्यांनी महाराष्ट्राची ओळख आणि मराठी अस्मिता जागतिक व्यासपीठावर ठामपणे मांडली. प्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी’ या कवितेच्या ओळींचाही त्यांनी उल्लेख केला. हा पुरस्कार केवळ आपला वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा आणि त्यांच्या विश्वासाचा गौरव असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी शासनाचा लाभ थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. विशेषतः महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे कुटुंब आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांना आर्थिक आधार देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण करण्याचा प्रयत्न या योजनांमागे असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या कमी करून विविध योजना आणि सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला.
हे ही वाचा:
विजय मल्ल्याला बनायचंय ‘कॉकरोच’!

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

सावलकॉट जलविद्युत प्रकल्पाला मिळणार वेग

याच वेळी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची दिशाही त्यांनी मांडली. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत त्यांनी ब्रिटनमधील उद्योग आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन केले. फिनटेक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक, शिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असल्याने या दोन शहरांमधील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

हाऊस ऑफ लॉर्ड्समधील या सन्मानामुळे महाराष्ट्राच्या विकासकामांची आणि सामाजिक योजनांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेला महाराष्ट्रीय समाज हा भारत आणि ब्रिटनमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत शिंदे यांनी या समुदायाच्या योगदानाचेही कौतुक केले. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा केवळ एका राजकीय नेत्याच्या सन्मानापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राची विकासदृष्टी, मराठी अस्मिता आणि भारत-ब्रिटनमधील वाढत्या सहकार्याचा संदेश देणारा ठरला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा