30.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरदेश दुनियामोदींचा ब्रिक्समधील ‘तो’ फोटो सांगतोय भारताची कूटनीती!

मोदींचा ब्रिक्समधील ‘तो’ फोटो सांगतोय भारताची कूटनीती!

भारताचे महत्त्वाच पटवून देणारा फोटो असल्याची चर्चा

Google News Follow

नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी या संघटनेतील सदस्य देशांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. अशातच या कार्यक्रमादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे महत्त्वाच पटवून देणारा हा फोटो असल्याचे बोलले जात आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन हे हातात हात घालून चालत असून शेजारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा चालत असल्याचे दिसत आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांचा हा भारत दौरा विशेष महत्त्वाचा आहे. कारण इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताचा हा पहिलाच दौरा आहे. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि पेझेश्कियन यांची दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत ही दुसरी भेट आहे. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी बिश्केक येथे झालेल्या SCO परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीत भारत-इराण संबंधांसह पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना, संघर्षातील सर्व प्रश्न संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून सोडवले पाहिजेत, असे पुन्हा सांगितले. तसेच पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यासोबतच सागरी मार्गांची सुरक्षितता, व्यापारासाठी समुद्री वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि खलाशांच्या सुरक्षेचाही मुद्दा चर्चेत आला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे समुद्री व्यापार आणि खलाशांच्या सुरक्षेवर परिणाम होत असताना भारताने या मुद्द्यांना विशेष महत्त्व दिले आहे. मोदी यांनी ब्रिक्समध्ये इराणच्या सातत्यपूर्ण सहभागाचेही स्वागत केले. जागतिक दक्षिणेतील देशांमध्ये सहकार्य, नवकल्पना, लवचिकता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

माजी लष्करी हवालदाराने चोरल्या चार AK-203 रायफल्ससह १,९०० काडतुसे

चॅट जीपीटीच्या मदतीने बनवले होते पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र

सुरक्षित समुद्री वाहतूक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोपरी

होर्मुझनंतर बाब-अल-मंदेब समुद्रधुनीही धोक्यात

दरम्यान, मोदी, पेझेश्कियन, पुतिन आणि सिरील रामाफोसा हे चौघेही एकत्र चालतानाचे दृश्य भारताच्या संतुलित परराष्ट्र धोरणाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. एकीकडे भारत पश्चिम देशांशी संबंध मजबूत ठेवत असताना दुसरीकडे रशिया आणि इराणसोबतही आपले रणनीतिक संबंध कायम ठेवत आहे. त्यामुळे ब्रिक्सच्या मंचावर दिसलेले हे दृश्य भारताच्या बहुआयामी कूटनीतीकडे लक्ष वेधणारे ठरले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा