29 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरक्राईमनामाचॅट जीपीटीच्या मदतीने बनवले होते पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र

चॅट जीपीटीच्या मदतीने बनवले होते पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र

रोहन पारिखची कबुली

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. २४ वर्षीय रोहन पारिख याने पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMOचे बनावट ओळखपत्र आणि संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी चॅट जीपीटी (ChatGPT) चा वापर केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पारिखला ५ दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे बनावट PMO ओळखपत्राच्या आधारे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ च्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी ही घटना घडली. पोलिसांच्या रिमांड अर्जानुसार, पारिखने २०२५ पासून चॅट जीपीटीच्या मदतीने बनावट PMO ओळखपत्र आणि इतर अधिकृत कागदपत्रे तयार केल्याचे चौकशीत सांगितले. कुटुंबीय आणि सामाजिक वर्तुळात आपला प्रभाव वाढवणे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे आणि इतरांवर छाप पाडणे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता पारिख हा दिलीप कुंडे आणि आणखी एका फरार साथीदारासह जिओ वर्ल्ड प्लाझा येथे पोहोचला होता. कुंडे याच्याकडे रिव्हॉल्वर असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना अडवण्यात आले. त्यावेळी पारिखने आपण PMO अधिकारी असल्याचा दावा करत मोबाईलवर डिजिटल ओळखपत्र दाखवले. मात्र तपासात हे ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. पोलिसांनी पारिखच्या खार येथील घराची झडती घेतली असता PMOशी संबंधित असल्याचे भासवणारी अनेक बनावट इंग्रजी कागदपत्रे सापडल्याचे सांगितले आहे. त्याच्या मोबाईलचीही तपासणी करण्यात आली असून, PMOशी संबंधित पत्रव्यवहार तयार करण्यासाठी करण्यात आलेले शोध आढळल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

या प्रकरणात पारिखसोबत अटक करण्यात आलेला दिलीप कुंडे हा ४९ वर्षीय माजी लष्करी कर्मचारी आहे. त्याच्याकडे असलेले रिव्हॉल्वर वैयक्तिक असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून, पारिखचा बॉडीगार्ड म्हणून काम करताना तो शस्त्राचा व्यावसायिक वापर करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र पोलिसांनी या घटनेचा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

सुरक्षित समुद्री वाहतूक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोपरी

होर्मुझनंतर बाब-अल-मंदेब समुद्रधुनीही धोक्यात

मुंबईत एफडीएकडून पाच हॉटेल्सचे परवाने निलंबित

मदतीला ना पाकिस्तान, ना अमेरिका! हूतींच्या संकटात सौदी अरेबिया एकटा?

दरम्यान, पारिखच्या वकिलांनी न्यायालयात वेगळा दावा केला होता. २०२४ मध्ये ‘तरुण गुप्ता’ किंवा ‘तरुण कपूर’ नावाच्या व्यक्तीने पारिखशी संपर्क साधून संरक्षणविषयक धोरणाशी संबंधित सल्लागार पदाची ऑफर दिल्याचे बचाव पक्षाने सांगितले. त्याला ऑफर लेटर, डिजिटल ओळखपत्र आणि पंतप्रधानांच्या नावाने कथित पत्रव्यवहारही पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र या नियुक्तीला किंवा कथित पत्रव्यवहाराला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा