29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेषमुंबईत एफडीएकडून पाच हॉटेल्सचे परवाने निलंबित

मुंबईत एफडीएकडून पाच हॉटेल्सचे परवाने निलंबित

कांजूरमार्गच्या वडापाव सेंटरमध्ये अस्वच्छतेचा कळस

Google News Follow

मुंबईत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक कारवाई केली आहे. शहरातील विविध भागांत करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने पाच अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये एकवीरा झुणका भाकर केंद्र, मनीषा स्वीट्स, नवाब सीख कॉर्नर, हॉटेल अश्विन आणि कांजूरमार्ग पश्चिम येथील श्री गजानन वडापाव स्नॅक्स सेंटरचा समावेश आहे.

कांजूरमार्ग येथील गजानन वडापाव सेंटरच्या तपासणीत अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. अन्न तयार करण्याची जागा उघडी असून स्वयंपाकघराला दरवाजाही नसल्याचे समोर आले. कीटक आणि उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. फरशी अस्वच्छ होती, नाल्यांमध्ये अन्नकचरा आणि सांडपाणी साचले होते, तर उंदराच्या विष्ठेच्या खुणाही आढळल्या. तयार अन्न झाकण्यासाठी चक्क वर्तमानपत्रांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय, अन्न तयार करणारा एक कर्मचारी तंबाखू चघळताना आढळला, तर खराब झालेला कांदाही तपासणीदरम्यान सापडला. या प्रकारामुळे ग्राहकांना निकृष्ट आणि असुरक्षित अन्न दिले जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
हे ही वाचा:
मदतीला ना पाकिस्तान, ना अमेरिका! हूतींच्या संकटात सौदी अरेबिया एकटा?

जागतिक अर्थव्यवस्थेचा नवा केंद्रबिंदू ब्रिक्स

विरोधकांची रडारड; आयएमएफ मात्र भारताच्या जीडीपीवर खुश

साखरेचे दर भडकू नयेत म्हणून सरकार अलर्ट

मुंबईतील इतर काही भागांमध्येही तपासणीदरम्यान स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे आढळले. सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने एफडीएकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व्यवसाय चालकांनी स्वच्छता, अन्नाची साठवणूक आणि हाताळणीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. नियमांकडे दुर्लक्ष करून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा