26 C
Mumbai
Wednesday, September 30, 2026
घरबिजनेससाखरेचे दर भडकू नयेत म्हणून सरकार अलर्ट

साखरेचे दर भडकू नयेत म्हणून सरकार अलर्ट

कारखान्यांना प्रशासनाचे कडक निर्देश

Google News Follow

Related

गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना बाजारात पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सणांच्या काळात मिठाई, बिस्किटे, चॉकलेटसह विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादनासाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर साखरेचा कृत्रिम तुटवडा किंवा साठेबाजी होऊन दर वाढू नयेत, यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत.

अलीकडेच साखरेच्या दरात मोठी वाढ झाली होती. भविष्यात दर आणखी वाढतील या अपेक्षेने काही ठिकाणी साखरेचा साठा करून ठेवला जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी बाजारातील पुरवठा कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विनाकारण दरवाढ झाल्यास सरकारकडून आवश्यक ती सुधारात्मक पावले उचलली जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. सध्या दर काही प्रमाणात खाली आले असले तरी दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत ते अजूनही लक्षणीय वाढलेले आहेत.
हे ही वाचा:
मुंबई-पुण्यासह देशभरात बँकांना सलग चार दिवस टाळे!

बांगलादेशला हरवून भारत आशिया कपच्या फायनलमध्ये!

पाकिस्तानात १४ वर्षांच्या हिंदू मुलींचे अपहरण; धर्मांतर मग निकाह

‘लाल धातू’च्या दरात तुफान तेजी

देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्राने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली आहे. त्यापैकी जवळपास ८ लाख टन साखरेच्या आयातीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. देशांतर्गत उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने आयातीच्या माध्यमातून बाजारातील पुरवठा वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जवळपास दशकभरानंतर भारताला ब्राझीलमधून साखर आयात करण्याची वेळ आली आहे.

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर साठा मर्यादाही लागू करण्यात आली आहे. साखर कारखान्यांना उत्पादन आणि विक्रीची माहिती नियमितपणे सरकारला देण्याचे निर्देश देण्यात आले असून, या आकडेवारीच्या आधारे बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे आगामी सणासुदीत साखरेची मागणी वाढली तरी पुरवठा सुरळीत राहावा आणि ग्राहकांना अनावश्यक दरवाढीचा फटका बसू नये, यासाठी सरकारने साखर उद्योगाला सतर्क केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा