30.5 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरबिजनेस‘लाल धातू’च्या दरात तुफान तेजी

‘लाल धातू’च्या दरात तुफान तेजी

सोने-चांदीनंतर तांब्याचाही विक्रमी भाव

Google News Follow

Related

सोने आणि चांदीच्या दरवाढीने बाजाराचे लक्ष वेधून घेतले असतानाच आता तांब्याच्या किमतीनेही विक्रमी पातळी गाठली आहे. लंडन मेटल एक्स्चेंजमध्ये तांब्याचा दर १४ हजार ७०० डॉलर प्रति टनांच्या पुढे पोहोचला असून, तांब्याच्या या तेजीमागे वाढती औद्योगिक मागणी, मर्यादित पुरवठा आणि अमेरिकेच्या आयातशुल्काचे धोरण ही प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे. तांब्याचा वापर केवळ पारंपरिक उद्योगांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इलेक्ट्रिक वाहनं, वीजवाहिन्या, अक्षय ऊर्जा प्रकल्प, डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी तांबे अत्यावश्यक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात तांब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
AI च्या विरोधात चक्क रोबोट्सच रस्त्यावर उतरले

मल्ल्याच्या १५ हजार कोटींच्या वसुलीने प्रकरण संपणार नाही!

सोसायटीत महाप्रसाद करताय, मग आधी एफडीएला कळवा!

एआय बनतोय हल्लेखोरांचे नवे हत्यार! सायबर हल्ले, हेरगिरी, शस्त्रविकासात गैरवापर

दरम्यान, अमेरिकेकडून तांब्याच्या आयातीवर शुल्क लावण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारातील समीकरण आणखी बदलले आहे. संभाव्य शुल्क टाळण्यासाठी अमेरिकेतील व्यापारी आणि कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर तांब्याची खरेदी करून साठवणूक सुरू केली आहे. त्यामुळे अमेरिकेतील तांब्याचा साठा वाढत असताना इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये उपलब्ध साठा तुलनेने कमी झाला आहे. मागणी कायम आणि उपलब्ध पुरवठा मर्यादित राहिल्याने तांब्याच्या किमतीवर चढता दबाव निर्माण झाला आहे. त्यातच जगातील प्रमुख तांब्याच्या खाणींमधून उत्पादन वाढवणे सहज शक्य नसल्याने पुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

तांब्याला अनेकदा ‘लाल धातू’ आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा ‘थर्मामीटर’ म्हटले जाते. कारण उद्योग, बांधकाम, वीज, वाहतूक आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र सध्याची दरवाढ ही केवळ अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत देत नाही. अमेरिकेचे संभाव्य शुल्क, बाजारातील साठेबाजी, पुरवठ्यातील अडचणी आणि एआय तसेच ऊर्जा संक्रमणामुळे वाढणारी मागणी या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम तांब्याच्या दरावर होत आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेच्या व्यापार धोरणाकडे आणि जागतिक तांबे पुरवठ्याकडे बाजाराचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा