27 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरराजकारणचिदंबरमना जे दिसले नाही, ते थरूर यांनी पाहिले!

चिदंबरमना जे दिसले नाही, ते थरूर यांनी पाहिले!

ब्रिक्स परिषदेतून भारताचा फायदा होणार असल्याचे विधान

Google News Follow

Related

भारतात होत असलेल्या ब्रिक्स (ब्रिक्स) परिषदेवरून काँग्रेसमध्येच वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ब्रिक्ससह बहुपक्षीय संघटनांमधून भारताला मिळणाऱ्या ठोस लाभांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मात्र ब्रिक्स परिषदेचे समर्थन केले आहे. ही परिषद भारताची राजनैतिक ताकद आणि जागतिक पातळीवरील प्रभाव दाखवणारी असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा शशी थरूर यांनी मांडलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

थरूर यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना ब्रिक्स हे जागतिक दक्षिणेतील देशांना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. ब्रिक्समध्ये ११ देशांचा समावेश असून, हे देश जगाच्या लोकसंख्येतील मोठा हिस्सा आणि जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे ४१ टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतात, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे ब्रिक्सचे महत्त्व कमी लेखता येणार नाही, असे थरूर यांनी स्पष्ट केले.

भारत यंदा ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८वी ब्रिक्स परिषद होणार असून, यंदाच्या परिषदेची संकल्पना ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता’ अशी आहे. ब्रिक्स सदस्य देशांसह काही निरीक्षक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखही परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भारताला अनेक देशांच्या प्रमुखांशी थेट चर्चा करण्याची संधी मिळणार असल्याचे थरूर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मल्ल्याच्या १५ हजार कोटींच्या वसुलीने प्रकरण संपणार नाही!

सोसायटीत महाप्रसाद करताय, मग आधी एफडीएला कळवा!

एआय बनतोय हल्लेखोरांचे नवे हत्यार! सायबर हल्ले, हेरगिरी, शस्त्रविकासात गैरवापर

आयआरसीटीसी प्रकरणी लालू कुटुंबाविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश

याउलट, पी. चिदंबरम यांनी नुकतेच ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना, जी-२० आणि क्वाड यांसारख्या विविध बहुपक्षीय संघटनांमध्ये भारत सहभागी असला तरी त्यातून देशाला नेमके कोणते ठोस फायदे मिळाले, असा प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या दोन-तीन ब्रिक्स परिषदांमधून भारताला ठोस परिणाम किंवा फायदे दिसले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. चिदंबरम यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांची भूमिका काँग्रेसमधील चिदंबरम यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा