28.4 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरस्पोर्ट्सबांगलादेशला हरवून भारत आशिया कपच्या फायनलमध्ये!

बांगलादेशला हरवून भारत आशिया कपच्या फायनलमध्ये!

Google News Follow

Related

महिला आशिया कप २०२६ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २० षटकांत ७ बाद १०९ धावांवर रोखला गेला.

भारताकडून शेफाली वर्माने ४० चेंडूंत ६४ धावांची आक्रमक खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. या कामगिरीसाठी तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. गोलंदाजीत दीप्ती शर्माने २६ धावांत ३ विकेट, तर नंदिनी शर्माने २ विकेट घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

नाणेफेक गमावल्यानंतर भारताला सुरुवातीलाच धक्का बसला. ९ धावांवर स्मृती मानधना अवघ्या २ धावांवर बाद झाली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि प्रतिका रावल यांनी डाव सावरला. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले.

प्रतिका रावलने २० धावा केल्यानंतर तिचा डाव संपला. त्यानंतर शेफालीने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत ३३ धावांची भागीदारी केली. शेफालीने आपल्या ६४ धावांच्या खेळीत आक्रमक फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवली.

यानंतर हरमनप्रीतने ऋचा घोषसोबत ३६ धावांची भागीदारी केली. ऋचाने २१ धावा केल्या. तर हरमनप्रीतने २८ चेंडूंत २ षटकारांसह नाबाद २४ धावा करत भारताला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. दीप्ती शर्मासोबतही कर्णधाराने ८ चेंडूंत २१ धावांची भागीदारी केली.

बांगलादेशकडून सुलताना खातूनने २ विकेट घेतल्या. मारूफा अख्तर, नाहिदा अख्तर आणि राबिया खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. दिलारा अख्तर आणि जुवैरिया फिरदौस यांनी पहिल्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. फिरदौसने १४ धावा केल्या.

यानंतर शोभना मोस्तरीने १८ धावा, तर कर्णधार निगार सुल्तानाने १९ धावा केल्या. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करत बांगलादेशला ६६ धावांपर्यंत नेले.

मात्र ही भागीदारी तुटल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजीची घसरण सुरू झाली. ८३ धावांपर्यंत बांगलादेशने ५ विकेट गमावल्या. फहिमा खातून आणि शोर्ना अख्तर यांनी सहाव्या विकेटसाठी २४ चेंडूंत २६ धावा जोडून संघाला १०९ धावांपर्यंत नेले.

मात्र डावाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर नंदिनी शर्माने फहिमा खातून (१४) आणि राबिया खान (०) यांना बाद करत बांगलादेशचा डाव १०९ धावांवर ७ विकेट असा रोखला.

भारताकडून दीप्ती शर्माने ३ विकेट, तर नंदिनी शर्माने २ विकेट घेतल्या. श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी १ विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या विजयासह भारताने महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता १३ सप्टेंबरला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील विजेत्या संघाशी भारताचा अंतिम सामना होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा